Join us  

महेंद्रसिंग धोनीबरोबर थर्टी फर्स्ट साजरा करतोय भारताचा हा 'बॅड बॉय' क्रिकेटपटू

काही दिवसांपूर्वी धोनी हा दुबईमध्ये पार्टी करत असल्याचा फोटो वायरल झाला होता. यावेळी धोनीबरोबर भारतीय संघातील युवा यष्टीरक्षक रिषभ पंत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 5:13 PM

Open in App
ठळक मुद्देभारताचा हा 'बॅड बॉय' क्रिकेटपटू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे.

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे सध्या तो विश्रांती घेत असताना आयुष्याचा आनंद लुटत आहे. सध्याच्या घडीला धोनीचा एक फोटो चांगलाच वायरल होत आहे. या फोटोमध्ये धोनीबरोबर थर्टी फर्स्ट साजरा करताना भारताचा 'बॅड बॉय' क्रिकेटपटू दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी धोनी हा दुबईमध्ये पार्टी करत असल्याचा फोटो वायरल झाला होता. यावेळी धोनीबरोबर भारतीय संघातील युवा यष्टीरक्षक रिषभ पंत होता. धोनी आणि पंतचा पार्टीचा फोटोही चांगलीच वायरल झाला होता. हा फोटो वायरल झाल्यावर चाहत्यांनी पंतला ट्रोल केले होते.

भारताचा हा 'बॅड बॉय' क्रिकेटपटू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. दुखापतींवर त्याने उपचार घेतले आहेत. आता या दुखापतीमधून तो सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी तो धोनीबरोबर पार्टी करत आहे. आता हा क्रिकेटपटू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर हा क्रिकेटपटू आहे भारता अष्टपैलू हार्दिक पंड्या.

कामगिरी सुधारायची सोडून रिषभ पंत करतोय दुबईमध्ये पार्टी; व्हिडीओ झाला वायरल

 चांगली कमगिरी करण्यात सातत्याने अपयश येत असेल तर खेळाडू सराव करण्यावर जास्त भर देतो. पण भारताचा युवा यष्टीरक्षक मात्र बिनधास्त आहे. सातत्याने नापास होऊनही त्याला संघात स्थान मिळाल्याने तो बिनधास्त आहे. सध्या मिळालेल्या वेळात सराव करण्यापेक्षा पंत हा दुबईमध्ये पार्टी करण्यात दंग असल्याचे पाहायला मिळाले. या पार्टीचा एक व्हिडीओही चांगलाच वायरल झालेला आहे.

विश्वचषकापासून ते आता नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांमध्ये पंतला कायम संघात स्थान देण्यात आले. पण एवढ्या संधी देऊनही त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात तर पंतने तब्बल तीन झेल सोडले. त्याचबरोबर संघाला गरज असताना फक्त सात धावा करून तो बाद झाला.

सध्या ख्रिसमस सण सेलिब्रेट करायला पंत दुबईमध्ये गेला आहे. एका हॉटेलमध्ये पंत आणि त्याचे काही मित्र ख्रिसमस सेलिब्रेट करताना दिसत आहेत. खास गोष्ट म्हणजे यावेळी पंतबरोबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही दिसत आहे.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीहार्दिक पांड्या