Join us  

Fakhar Zaman : फखर जमानवर झाला अन्याय; भारतीय चाहते विसरले पाकिस्तानसोबतचे वैर अन्...

South Africa vs Pakistan : आफ्रिकेनं हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका १-१अशी बरोबरीत आणली. या सामन्यात पाकिस्तानकडूनही सडेतोड उत्तर मिळालं. एकट्या फखर जमान ( Fakhar Zaman) यानं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 10:14 AM

Open in App

South Africa Vs Pakistan : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातला दुसरा वन डे सामना थरराक झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्ताननं अखेरच्या चेंडूवर जिंकल्यानंतर यजमान आफ्रिकेनं दुसऱ्या सामन्यात जोरदार पलटवार केला. आफ्रिकेनं हा सामना १७ धावांनी जिंकून मालिका १-१अशी बरोबरीत आणली. या सामन्यात पाकिस्तानकडूनही सडेतोड उत्तर मिळालं. एकट्या फखर जमान ( Fakhar Zaman) यानं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याची ही खेळी वादग्रस्त पद्धतीनं संपुष्टात आली, पण भारतीयांकडून त्याचं कौतुक झालं.  Fakhar Zaman Run Out : क्विंटन डी कॉकनं पाकिस्तानी फलंदाजाचा 'पोपट' केला, मोठा वादच निर्माण झाला; Video

आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३४१ धावांचा डोंगर उभा केला. क्विंटन डी कॉक ( ८०), कर्णधार टेंबा बवूमा ( ९२), रॅसी व्हॅन डेर ड्युसन ( ६०), डेव्हिड मिलर ( ५०*) आणि एडन मार्कराम ( ३९) यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. मिलरने तर २७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५० धावा पूर्ण केल्या. ६ बाद ३४१ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज झटपट माघारी परतले. फखर जमान हा एकट्यानं आफ्रिकेचा सामना करत होता. त्यानं अखेरच्या षटकापर्यंत सामन्याची चुसर कायम राखताना अनेक विक्रम मोडले. फखर जमाननं १५५ चेंडूंत १८ चौकार व १० षटकारासह १९३ धावा चोपल्या. पाकिस्तानला ९ बाद ३२४ धावा करता आल्या.

पाकिस्तानच्या फखर जमानचं भारतीय करतायेत कौतुक..  

टॅग्स :पाकिस्तानद. आफ्रिका