Join us  

एक शेर, सारे ढेर ... भारतीय युवा गोलंदाजाने गारद केला पूर्ण संघ

या युवा गोलंदाजाने फक्त ९.५ षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील दहाच्या दहा फलंदाजांना माघारी धाडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 6:28 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचे माजी महान गोलंदाज अनिल कुंबळे यांनी दहा विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला होता. पण त्यांच्या या विक्रमाची बरोबरी एका युवा गोलंदाजाने केली आहे. या युवा गोलंदाजाने फक्त ९.५ षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील दहाच्या दहा फलंदाजांना माघारी धाडले आहे.

कुंबळे यांचा कित्ता गिरवण्याचा मान पटकावला आहे तो मणिपूरच्या रॅक्स राजकुमार सिंहने. मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामध्ये बीसीसीआय आयोजित कुच बिहार करंडक (१९-वर्षांखालील) स्पर्धेतील एक सामना खेळवण्यात आला. १८ वर्षीय मध्यमगती गोलंदाज रॅक्सने या सामन्यात ९.५ षटके गोलंदाजी केली. या ९.५ षटकांमध्ये त्याने फक्त ११ धावा दिल्या. त्याचबरोबर त्याने सहा षटे निर्धाव टाकली. 

अनिल कुंबळे यांनी कसा केला पाकिस्तानी संघाचा खात्मा, पाहा हा व्हिडीओ

रॅक्सच्या या देदिप्यमान कामगिरीमुळे अरुणाचल प्रदेशला दुसऱ्या डावात फक्त ३६ धावाच करता आल्या. पहिल्या डावातही रॅक्सने पाच बळी मिळवले होते. रॅक्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मणिपूरने या सामन्यात १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. 

टॅग्स :बीसीसीआय