Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांचा मालिका विजय, मिताली मालिकावीर, दक्षिण आफ्रिकेवर ५४ धावांनी मात

मिताली राजच्या (६२) दमदार अर्धशतकी खेळीनंतर शिखा पांडे, रुमेली धर व राजेश्वरी गायकवाड (प्रत्येकी ३ बळी) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय महिला संघाने शनिवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा ५४ धावांनी पराभव केला आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय मिळवला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:46 IST

Open in App

केपटाऊन : मिताली राजच्या (६२) दमदार अर्धशतकी खेळीनंतर शिखा पांडे, रुमेली धर व राजेश्वरी गायकवाड (प्रत्येकी ३ बळी) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारतीय महिला संघाने शनिवारी खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या लढतीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा ५४ धावांनी पराभव केला आणि पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय मिळवला.मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताने वन-डे मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता. टी-२० मालिकेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने आज मालिका विजय साकारला. दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटच्या दोन्ही प्रकारच्या मालिका जिंकणारा पहिला भारतीय महिला संघ ठरला. चार डावांमध्ये १९२ धावा फटकावणारी मिताली मालिकावीर पुरस्कारची मानकरी ठरली.मिताली म्हणाली,‘सुरुवातीला या खेळपट्टीवर फटकेबाजी करताना अडचण भासली, पण त्यानंतर मात्र चेंडू चांगले बॅटवर येत होते.’कर्णधार हरमनप्रीत म्हणाली, ‘आम्ही अपेक्षेपेक्षा २० धावा कमी केल्या, पण गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मिताली व जेमीने चांगली फलंदाजी केली तर शिखा व पूनम यादव यांनी गोलंदाजीमध्ये छाप सोडली. मितालीने १७ वर्षीय जेमिमाच्या साथीने दुसºया विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली.भारताने २० षटकांत ४ बाद १६६ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाºया दक्षिण आफ्रिका संघाचा डाव १८ षटकांत ११२ धावांत गुंडाळला. भारताच्या डावात मिताली राजने ५० चेंडूंना सामोरे जाताना ६२ धावांची खेळी केली. युवा खेळाडू जेमिमा रोड्रिग्सने ३४ चेंडूंमध्ये ४४ धावा फटकावल्या. मितालीच्या अर्धशतकी खेळीत ८ चौकार व ३ षटकार ठोकले तर जेमिमाने तीन चौकार व दोन चौकार लगावले. कर्णधार हरमनप्रीत कौरने १७ चेंडूंमध्ये २ चौकार व १ षटकार लगावताना नाबाद २७ धावा केल्या. (वृत्तसंस्था)धावफलकभारत :- मिताली राज झे. ली गो. इस्माईल ६२, स्मृती मंधाना झे. एम. क्लास गो. काप १३, जेमिमा रॉड्रिग्स झे. व गो. खाका ४४, हरमनप्रीत कौर नाबाद २७, वेदा कृष्णमूर्ती धावाबाद ०८. अवांतर (१२). एकूण २० षटकांत ४ बाद १६६. बाद क्रम : १-३२, २-१३०, ३-१३४, ४-१६६. गोलंदाजी : काप ४-१-२२-१, खाका ४-०-४१-१, इस्माईल ४-०-३५-१, क्लास २-०-२१-० निकेर्क ४-०-२२-०, नत्झाखे २-०-२१-०.दक्षिण आफ्रिका :- लिझेली ली झे. यादव गो. धर ०३, डॅन व्हॅन निकेर्क झे. पांडे गो. धर १०, सुन ल्युस त्रि. गो. पांडे ०५, मिगनोन प्रीझ झे. मिताली गो. पांडे १७. चोले ट्रायोन झे. कौर गो. गायकवाड २५, नडिने डी क्लेर्क त्रि. गो. पांडे ०४, मरिझमे काप झे. रोड्रिग्स गो. धर २७, शबनिम इस्माईल यष्टिचित भाटिया गो. यादव ०८, मसाबाता क्लास यष्टिचित भाटिया गो. गायकवाड ०९, अया बोंगा खाका झे. मंधाना गो. गायकवाड ०१, रैसिबे नटोझ्के नाबाद ००. अवांतर (३). एकूण १८ षटकांत सर्वबाद ११२. बाद क्रम : १-१२, २-१८, ३-२०, ४-४०, ५-४४, ६-७१, ७-१००, ८-१०८, ९-११२, १०-११२. गोलंदाजी : वस्त्राकार ३-१-१४-०, शिखा पांडे ३-०-१६-३, रुमेली धर ४-०-२६-३, पूनम यादव ४-०-२५-१, राजेश्वरी गायकवाड ३-०-२६-३, हरमनप्रीत कौर १-०-५-०.

टॅग्स :मिताली राजक्रिकेट