नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार आरोठे आणि खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याचे वृत्त बाहेर आले आहे. एका वृत्तपत्राने याबाबत माहिती प्रकाशित केली असून, संघातील काही खेळाडूंनी आरोठेंविरोधात बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याची माहिती आहे. आरोठेंच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला स्वतंत्र निर्णय घेता येत नसल्याचे खेळाडूंनी तक्रारीत म्हटले आहे.काही गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर खेळाडूंनी आमच्याकडे तक्रार केली. खेळाडूंनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे यासंदर्भात पुढे काय करता येईल, यावर सध्या विचार सुरू असल्याचे बीसीसीआयने म्हटले.काही खेळाडूंनी आरोठे यांना प्रशिक्षक पदावरून हटविण्याचीही मागणी केली. बीसीसीआयमधील सूत्रांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ आशिया चषक टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध पराभूत झाला होता.बीसीसीआय, सीओएच्या निर्णयाकडे लक्षबीसीसीआयमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णधार हरमनप्रीत कौर ही आरोठे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. आशिया चषक टी-२० दरम्यान अंतिम ११ जणांचा संघ निवडण्यात हरमनप्रीतचे मत विचारात घेतले जात नव्हते. त्यामुळे खेळाडूंची नाराजी पाहता बीसीसीआय व क्रिकेट प्रशासकीय समिती (सीओए) काय निर्णय घेते, हे पहावे लागेल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय महिला क्रिकेट संघात बंड...
भारतीय महिला क्रिकेट संघात बंड...
भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तुषार आरोठे आणि खेळाडूंमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याचे वृत्त बाहेर आले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:14 IST