Join us  

'त्या' हल्ल्यामुळे भारतीय संघाला करावी लागली विमानतळाबाहेर प्रतीक्षा 

भारतीय क्रिकेट संघाला विशाखापट्टणम विमानतळाबाहेर प्रतीक्षा करावी लागली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 7:52 PM

Open in App

मुंबई : विशाखापट्टनम विमानतळावर वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर गुरूवारी चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात जगनमोहन रेड्डी यांच्या हाताला दुखापत झाली होती. हल्लेखोराला जगनमोहन रेड्डी यांच्या सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. मात्र, या हल्ल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला विशाखापट्टणम विमानतळाबाहेर प्रतीक्षा करावी लागली. तिसऱ्या वन डे सामन्यासाठी भारतीय संघ विशाखापट्टणमवरून पुण्यासाठी रवाना झाला. मात्र, रेड्डी यांच्यावरील हल्ल्यामुळे विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आणि त्यामुळे भारतीय संघाला बराच काळ विमानतळाबाहेरच थांबावे लागले. भारतीय संघाचे खेळाडू ज्या बसमधून प्रवास करत होते, ती बस सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळाबाहेरच उभी करण्यात आली होती. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वन डे सामना शनिवारी पुण्यात खेळवण्यात येणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली