Join us  

भारतीय संघात जसप्रीत बुमराह 'यॉर्कर किंग', तर कोण आहे 'क्वीन', पाहा धमाकेदार व्हिडीओ...

जसप्रीत बुमराह हा 'यॉर्कर किंग' या नावाने प्रसिद्ध आहे. पण मग 'यॉर्कर क्वीन' कोण आहे, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:03 PM

Open in App
ठळक मुद्दे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एका धमाकेदार व्हिडीओमध्ये मिळू शकते. 

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने काल झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात पुनरागमन केले. जसप्रीत बुमराह हा 'यॉर्कर किंग' या नावाने प्रसिद्ध आहे. पण मग 'यॉर्कर क्वीन' कोण आहे, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एका धमाकेदार व्हिडीओमध्ये मिळू शकते. 

सध्याच्या भारताचा वेगवान मात्र हा जगातील सर्वात जबरदस्त असल्याचे म्हटले जाते. कारण भारताकडे वेगवान गोलंदाजांची पूर्ण टीम असल्याचेच पाहायला मिळते. जर एखादा गोलंदाज जायबंदी झाला तर त्याच्या जागी दुसरा उभा राहतो, पण या गोष्टीचा भारताच्या विजयावर मात्र फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला भारताकडे जसे अनुभवी वेगवाान गोलंदाज आहेत, तसेच युवाही आहेत. त्यामुळे भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय पाहायला मिळतो.

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर धडाकेबाज विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले. या विजयाच्या जोरावर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात भारताचा खेळाडू एका रात्रीत स्टार झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यानंतर झालेल्या एका मुलाखतीमध्ये यॉर्कर क्वीन कोण, या गोष्टीचा खुलासा करण्यात आला. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने सामन्यानंतर शार्दुल ठाकूर आणि नवदीन सैनी या दोन्ही युवा वेगवान गोलंदाजांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नेमके काय घडले, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल...

या मुलाखतीमध्ये चहलने सैनीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. त्याचबरोबर सैनीने या सामन्यात टाकलेल्या यॉर्करचेही कौतुक करण्यात आले. त्याचवेळी चहल म्हणाला की, " भारतीय संघात जसप्रीत बुमराह 'यॉर्कर किंग' आहे, तर तू 'क्वीन' आहेस का? " या प्रश्नावर सैनीला हसू आवरता आले नाही. पण त्यानंतर आपण या गोष्टीसाठी भरपूर मेहनत घेतल्याचेही सांगितले.

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध श्रीलंकाशार्दुल ठाकूरयुजवेंद्र चहल