Join us  

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी आणि कोणाचा पत्ता झाला कट

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी संघनिवड होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 10:53 PM

Open in App
ठळक मुद्देन्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या मोठ्या दौऱ्यासाठी भारतीय संघात कोणाला स्थान देण्यात आले आणि कोणाला डच्चू देण्यात आला डच्चू जाणून घ्या...

न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी रोहितने विश्रांती घेतली होती. आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. या संघातून युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला वगळण्यात आले आहे. संजूला रिषभ पंतऐवजी खेळवण्यात आले होते. संजूला फक्त दोन सामनेच खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर त्याला संघातून बाहेर काढले आहे. 

न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी भारताचा संघ  - विराट कोहली (कर्णधार),  शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.

 24 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या दौऱ्यासाठी होणाऱ्या संघनिवडीपूर्वी अष्टपैलू हार्दिक पांड्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी रविवारी संघनिवड होणार आहे. 

  कमरेला झालेल्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्या गेल्या चार महिन्यांपासून संघाबाहेर आहे. आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी तो तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमक करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पांड्या नुकत्याच झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला. त्यामुळे त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. 

 शनिवारी मुंबईत झालेल्या तंदुरुस्ती चाचणीत नापास झाल्यानंतर हार्दिक पांड्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारत अ संघातही स्थान देण्यात आलेले नाही. पांड्याऐवजी तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकर याला भारत अ संघात स्थान देण्यात आले आहे. भारत अ संघ न्यूझीलंडमध्ये तीन लीस्ट ए सामने खेळणार आहे.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड