Join us  

Indian Playing XI for 3rd T20: अपयशी लोकेश राहुलला मिळणार आणखी एक चान्स, रोहित शर्माला संधी मिळणे अवघड?

Indian Playing XI for 3rd T20 : पहिल्या सामन्यात १ धाव अन् दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या टीम इंडियाचा ओपनर लोकेश राहुल ( Question on KL Rahul’s place?) याला आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 4:51 PM

Open in App

Indian Playing XI for 3rd T20 : पहिल्या सामन्यात १ धाव अन् दुसऱ्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या टीम इंडियाचा ओपनर लोकेश राहुल ( Question on KL Rahul’s place?) याला आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. पदार्पणात धडाकेबाज खेळी करणाऱ्या इशान किशन ( Ishan Kishan) सोबत तो आज सलामीला खेळणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियानं मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आजच्या सामन्यात बदल करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma) आजच्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे.  लग्नानंतर गुगलवर शोधली जातेय जसप्रीत बुमराहची जात अन् धर्म

लोकेश राहुलला आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत अपयश आले. तरीही कोहली त्याला आणखी एक संधी देण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्माला विश्रांती दिल्याचे कोहलीनं पहिल्या सामन्याच्या नाणेफेकी दरम्यान स्पष्ट केलं होतं. पण, राहुलच्या अपयशानंतरही रोहितला विश्रांती देणे योग्य आहे का, असा सवाल विचारला जात आहे. पहिल्या सामन्यात शिखर धवन अपयशी ठरला अन् दुसऱ्या सामन्यातून त्याची गच्छंती झाली. हाच न्याय राहुलसाठी का नाही, असा सवालही अनेकजण विचारत आहेत. धवनच्या जागी संधी मिळालेल्या इशान किशननं पदार्पणातच 32 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 56 धावा कुटल्या. त्याच सामन्यात सूर्यकुमार यादवनंही ( Suryakumar Yadav) पदार्पण केलं, परंतु त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.  Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video

उत्सुकता ‘हिटमॅन’ची!इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सर्वांचे लागले आहे ती हिटमॅन रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे. पहिल्या दोन सामन्यांत रोहितला विश्रांती देण्यात आल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांत लोकेश राहुल अपयशी ठरला. शिवाय अनुभवी शिखर धवनला पहिल्या सामन्यात संधी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात संघाबाहेर बसविण्यात आले. अशा परिस्थितीत युवा इशान किशनने संधी साधताना तडाखेबंद अर्धशतक झळकावले. त्यामुळेच रोहित आणि इशान अशी सलामी जोडी तिसऱ्या सामन्यात पाहण्यास मिळू शकते. शिवाय दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असल्याने ही जोडी नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वासही चाहते व्यक्त करत आहेत.  Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

India Likely Playing XI for 3rd T20 – इशान किशन, लोकेश राहुल/रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माइशान किशनलोकेश राहुलशिखर धवन