टीम इंडियाच्या खेळाडूंची होणार पुन्हा कोरोना चाचणी; जाणून घ्या कारण

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, जलदगती गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि सलामीवीर रोहित शर्मा मंगळवारी चेन्नईत दाखल झाले. 

By स्वदेश घाणेकर | Updated: January 27, 2021 11:44 IST2021-01-27T11:43:18+5:302021-01-27T11:44:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian players to take COVID tests before checking into team hotel in Chennai | टीम इंडियाच्या खेळाडूंची होणार पुन्हा कोरोना चाचणी; जाणून घ्या कारण

टीम इंडियाच्या खेळाडूंची होणार पुन्हा कोरोना चाचणी; जाणून घ्या कारण

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया आता घरच्या मैदानावर तगड्या इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आज टीम इंडियाचे सर्व खेळाडू चेन्नईत दाखल होतील आणि चेन्नईच्या हॉटेलमध्ये दाखल होण्यापूर्वी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात येईल, असे BCCIने स्पष्ट केले. चेन्नईत दाखल झाल्यानंतर खेळाडू बायो बबलमध्ये राहतील. इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

इंग्लंडचा संघही आजच चेन्नईत दाखल होईल. इंग्लंडच्या संघानं श्रीलंकेत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असा निर्भेळ यश मिळवला. त्यामुळे इंग्लंडचे मनोबलही उंचावलेले आहे. चेन्नईत दोन्ही संघांना एकाच हॉटेलमध्ये थांबवण्यात येणार आहे. या दोन्ही संघातील खेळाडूंना सात दिवसांचं क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. संघाचे डॉक्टर अभिजीत साळवी यांनी स्पष्ट केले की,''हॉटेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी होणार आहे. ज्या खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, त्यांनाच बायो बबलमध्ये प्रवेश दिला जाईल.''

 

इंग्लंड मालिकेतील पहिल्या दोन कसोटींसाठीचा भारतीय संघ
( Indian squad for the first two Test matches against England) 

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार 

राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.   

 

भारतविरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक ( India vs England Full Time Table) 
 

कसोटी मालिका - 
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद

ट्वेंटी- 20  मालिका  (सर्व सामने अहमदाबाद)
 १) १२ मार्च पहिला टी-२०
२) १४ मार्च दुसरा टी-२०
३) १६ मार्च तिसरा टी-२०
४) १८ मार्च चौथा टी-२०
५) २० मार्च पाचवा टी-२०

वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे

Web Title: Indian players to take COVID tests before checking into team hotel in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.