यूथ आॅलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे अभियान बांगलादेशविरुद्ध

ब्यूनास आयर्स (अर्जेंटिना) येथे ६ ते १८ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या १८ वर्षांखालील यूथ आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ हॉकीमधील आपले अभियान बांगलादेशविरुद्ध सुरू करेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:50 IST2018-09-09T03:49:50+5:302018-09-09T03:50:20+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Indian hockey team campaign against Bangladesh in Youth Olympics | यूथ आॅलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे अभियान बांगलादेशविरुद्ध

यूथ आॅलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचे अभियान बांगलादेशविरुद्ध

नवी दिल्ली : ब्यूनास आयर्स (अर्जेंटिना) येथे ६ ते १८ आॅक्टोबरदरम्यान होणाऱ्या १८ वर्षांखालील यूथ आॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ हॉकीमधील आपले अभियान बांगलादेशविरुद्ध सुरू करेल. दुसरीकडे भारतीय महिला संघाची पहिली लढत आॅस्ट्रियाविरुद्ध होणार आहे. ही स्पर्धा फाईव्ह अ साईड (हॉकी फाईव्हज) प्रारूपात होणार आहे.
विवेक सागरच्या नेतृत्वाखाली खेळणाºया भारतीय संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आॅस्ट्रिया, केनिया, आॅस्ट्रेलिया (माजी विजेता) व कॅनडा (माजी उपविजेता) या संघांचा समावेश आहे. अ गटात अर्जेंटिना, मलेशिया, मेक्सिको, पोलंड, वनआतू आणि जाम्पिया हे संघ आहेत. महिला गटात भारतीय संघाबरोबर उरुग्वे, वनआतू, अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. भारतीय महिला संघाचे नेतृत्व सलीमा टेटेकडे सोपविण्यात आले आहे. हॉकी फाईव्हज प्रारूपात होणाºया या स्पर्धेत सहभागी होणाºया संघांत दोन गोलरक्षक, दोन डिफेंडर, दोन मिडफिल्डर आणि तीन फॉरवर्ड खेळाडूंचा समावेश असेल.

Web Title: Indian hockey team campaign against Bangladesh in Youth Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.