Join us  

विराटचा 'जबरा फॅन', भेटीसाठी आतुर असलेल्या चाहत्याचा १४०० किमी पायी प्रवास 

विराटचे चाहते विराटसाठी कोणत्याही थराला जातात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 2:24 PM

Open in App

Virat Kohli Fan :  भारतीय क्रिकेटर विराट कोहलीची जगभर ख्याती आहे. असा एकही भारतीय किंवा क्रिकेट प्रेमी शोधून देखील सापडणार नाही ज्याने विराट कोहली हे नाव ऐकलं नसेल.  आक्रमक खेळीने विराटने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.  संपूर्ण जगभरात विराटचे चाहते पाहायला मिळतात. सोशल मीडियावर देखील  त्याची तगडी फॅन फॉलोविंग पाहायला मिळते.  याचीच प्रचिती वारंवार येत असते. सध्या सोशल मीडियावर विराटच्या एका जबरा फॅनचा मोठा बोलबाला आहे. हा ध्येयवेडा चाहता विराटच्या भेटीसाठी चक्क लखनऊ येथून मुंबईत पायी चालत येतोय. त्याच्या पदयात्रेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

केवल विराटची एक झलक पाहण्यासाठी आतुर असलेल्या क्रिकेटप्रेमी चाहत्याच्या कृत्याने साऱ्यांचेच लक्ष वेधलं आहे. विनय असं या चाहत्याचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. हातात पोस्टर घेऊन तो विराट कोहलीला भेटण्यासाठी लखनऊ ते मुंबई पदयात्रेला निघाला आहे. 

क्रिकेट सामन्यांदरम्यान विराट कोहलीच्या तोंडून निघालेली वाक्य  किंवा डायलॉग त्याने पोस्टरवर लिहिले आहेत. याशिवाय प्रवासाचे काही तपशीलही पोस्टरमध्ये लिहिलेले आहेत. या पोस्टरवर लिहिलंय की - "मी नेहमीच माझ्या हातात बॅट घेऊन भारतासाठी सामना जिंकण्याचे स्वप्न पाहत होतो. हिच माझी क्रिकेट खेळण्याची प्रेरणा होती." पोस्टरमध्ये खाली लिहिले होते, "विराट कोहलीचा चाहता लखनऊ ते मुंबई पदयात्रा," अशी टॅगलाईन या चाहत्याने पोस्टरवर दिली आहे.

विराटच्या चाहत्यांची क्रेझ तसेच संख्या किती आहे याचा प्रत्यय या प्रकरणातून येतोय. विराटच्या प्रत्येक चाहत्याला त्याला भेटण्याची तीव्र इच्छा असते हे या चाहत्यामुळे पुन्हा एकदा जाणवते. पण प्रत्येकजण कोहलीला भेटू शकत नाही, त्यामुळे चाहते वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात.

टॅग्स :विराट कोहलीसोशल व्हायरल