Join us  

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या कामगिरीचे म्यूल्यमापन 

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीचे प्रशासकीय समितीकडून मूल्यमापन करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 3:21 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या कामगिरीचे प्रशासकीय समितीकडून मूल्यमापन करण्यात येणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रशासकीय समितीचे सदस्य आणि संघ व्यवस्थापक यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद हेही उपस्थित असणार आहेत. असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे.

हैदराबाद येथे 10 आणि 11 ऑक्टोबरला ही बैठक पार पडणार आहे. "प्रशासकीय समिती संघ व्यवस्थापनाशी चर्चा करणार आहे. दक्षिण आफ्रीका, इंग्लंड आणि दुबई ( आशिया चषक) दौऱ्यातील संघाच्या कामगिरीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही उपस्थित असणार आहेत. निवड समिती प्रमुख प्रसादही असतील,"अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रवी शास्त्री आणि कोहली यांच्यासोबतची प्रशासकीय समितीची ही दुसरी बैठक आहे. भारतीय संघाला परदेशात चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराटसेनेला आफ्रिका दौऱ्यावर  कसोटी मालिकेत 1-2 असा, तर इंग्लंड दौऱ्यावर 1-4 असा पराभव पत्करावा लागला.  

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय