भारतीय महिला संघाने इतिहास रचला; कसोटीत ८८ वर्षांत कोणालाच न जमलेला विक्रम नोंदवला

India Women vs England Women, Only Test - ९ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 05:47 PM2023-12-14T17:47:24+5:302023-12-14T17:47:56+5:30

whatsapp join usJoin us
India Women vs England Women, Only Test - Team India become second team in 88 years to score 400+ runs in a day in women’s Tests | भारतीय महिला संघाने इतिहास रचला; कसोटीत ८८ वर्षांत कोणालाच न जमलेला विक्रम नोंदवला

भारतीय महिला संघाने इतिहास रचला; कसोटीत ८८ वर्षांत कोणालाच न जमलेला विक्रम नोंदवला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Women vs England Women, Only Test - ९ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिलांनी पहिल्या दिवशी ७ बाद ४१० धावा केल्या. महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ८८ वर्षांत कुणालाच न जमलेला विक्रम आज भारतीय महिला संघाने करून दाखवला. शुभा सथिश, जेमिमा रॉड्रीग्ज, यास्तिका भाटिया व दीप्ती शर्मा यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी आजचा दिवस गाजवला. 

Video : हरमनप्रीत कौरची विचित्र विकेट, इंचभर अंतराने हुकली फिफ्टी; भारताच्या चारशेपार धावा 


डी वाय पाटीलवर सुरू असलेल्या या कसोटीत स्मृती मानधना ( १७) व शफाली वर्मा ( १९) यांना मोठी खेळी करता आली नाही. लॉरेन बेल व केट क्रॉस यांनी त्यांना बाद केले. पदार्पणवीर शुभा व जेमिमा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. शुभाने ७६ चेंडूंत ६९ धावा केल्या, तर जेमिमाने ९९ चेंडूंत ६८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभी होती. पण, फिफ्टी पूर्ण करण्यासाठीची धाव पूर्ण करताना तिची बॅट अडकली अन् रन आऊट होऊन ती माघारी परतली.  


हरमनप्रीतने ८१ चेंडूंत ४९ धावा केल्या. तिच्यानंतर यास्तिका व दीप्ती यांनी डाव सारवला. यास्तिका ८८ चेंडूंत ६६ धावा करून माघारी परतली. स्नेह राणानेही ३० धावांची खेळी केली. दीप्ती ६० धावांवर खेळतेय आणि भारताच्या ९४ षटकांत ७ बाद ४१० धावा झाल्या आहेत. महिला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात ४०० हून अधिक धावा करणारा भारत हा दुसरा संघ ठरला. यापूर्वी १९३५ मध्ये इंग्लंडने क्राईस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद ४३१ धावा केल्या होत्या. त्यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव ४४ धावांत गुंडाळला होता. अशा प्रकारे या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण ४७५ धावा झाल्या होत्या.  २०२२ मध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी ४४९ धावा झाल्या होत्या, पंरतु यापैकी ऑस्ट्रेलियाने ५ बाद २०४ व इंग्लंडने ९ बाद २४५ धावा केल्या होत्या.  

Web Title: India Women vs England Women, Only Test - Team India become second team in 88 years to score 400+ runs in a day in women’s Tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.