Join us  

भारताने पुढील दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी खेळावी

भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची नगण्य संख्या पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) दिवस- रात्र कसोटीचा आग्रह धरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:21 AM

Open in App

अ‍ॅडलेड: भारताविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची नगण्य संख्या पाहून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) दिवस- रात्र कसोटीचा आग्रह धरला आहे. ‘पुढील दौºयात भारताने विद्युतप्रकाशझोतात सामना खेळण्याविषयी फेरविचार करायला हवा,’असे त्यांनी म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाच्या अधिकाºयांनुसार कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात २३ हजार ८०२ प्रेक्षक होते. २०१३ ला मैदानाचे नूतनीकरण केल्यापासून ही सर्वात कमी प्रेक्षकसंख्या ठरली. ही चिंताग्रस्त बाब असल्याचे सीएला वाटते. सीएच्या सीईओना यासंदर्भात विचारणा करताच ते म्हणाले,‘ प्रेक्षक संख्या कमी झाल्याने दिवस रात्र कसोटी सामना व्हावा, याचे हे संकेत असावेत. प्रेक्षकांना काय हवे, याला फार महत्त्व असते. त्यांची उपस्थिती हेच दर्शवित असून मागच्यावर्षी येथे मोठी गर्दी झाली होती.’क्रिकेट आॅस्ट्रेलियानुसार मागच्यावर्षी अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ५५ हजार आणि त्याआधी द. आफ्रिकेविरुद्ध सामन्यात ३२ हजार २५५, न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात ४७.४४१ प्रेक्षकांची उपस्थिती राहिली. गुरुवारी प्रेक्षकसंख्या चार वर्षांआधी येथेच भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पहिल्या दिवसाच्या तुलनेत कमीच होती. त्या सामन्यात २५,६१९ प्रेक्षक उपस्थित झाले होते. (वृत्तसंस्था)>‘दिवस- रात्र कसोटीचे चाहते आमच्यापासून दुरावलेत, यात शंका नाही. आम्ही अ‍ॅडलेडमध्ये पुन्हा दिवस- रात्र कसोटी आयोजित करू इच्छितो. बीसीसीआय २०२०-२१ च्या पुढील दौºयात दिवस- रात्र कसोटी खेळेल, अशी अपेक्षा आहे. चाहत्यांच्या भावना लक्षात घेत भारतासारख्या संघाला दिवस- रात्र सामना खेळण्याची विनंती केली जाईल,’ असे सीईओचे मत आहे.