Join us  

इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्येही आता भारत जिंकणार; बीसीसीआय ५०० कोटी खर्च करणार

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारताला विजय मिळवता यावा, यासाठी बीसीसीआय तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 3:59 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवत इतिहास रचला आहे. कारण भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आली आहे. पण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारताला विजय मिळवता यावा, यासाठी बीसीसीआय तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना चांगलाच रंगतदार झाला. न्यूझीलंडचा संघ हा सामना सहज जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. कारण अखेरच्या षटकात न्यूझीलंडचा जिंकायला ९ धावांची गरज होती. षटकाच्या सुरुवातीलाच एक षटकारीही आला होता. पण मोक्याच्या क्षणी विल्यमसन बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर रॉस टेलर आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

भारताने हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो रोहित शर्मा. कारण अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत रोहितने संघाला विजय मिळवून दिला.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांचे वातावरण भारतापेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील खेळपट्ट्याही भारतापेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे भारताला काही वेळा या देशांमध्ये खेळताना समस्या जाणवते, पण ही समस्या आता भारतीय क्रिकेटपटूंना जाणवणार नाही.

बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स बनवण्यासाठी योजना आखत आहे. या योजनेसाठी ५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेअंतर्गत भारतामध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांसारख्या खेळपट्ट्या बनवणार आहे. त्यासाठी तेथील वातावरणापासून ते मातीपर्यंतचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतर या खेळपट्या बनवण्यात येणार आहे. या योजनेसाठी एक  ते दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो, असे म्हटले जात आहे.

टॅग्स :बीसीसीआय