Join us  

India vs West Indies : पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणाला मिळणार संधी; कोण करणार रोहितबरोबर ओपनिंग...

शिखर धवन हा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या संजूला संधी मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 5:22 PM

Open in App

हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला काही तासांचा अवधी राहीलेला आहे. पण या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणते खेळाडू संघात असतील, याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.

भारताची सलामीची जबाबदारी रोहित शर्मावर असेल. पण रोहितबरोबर यावेळी कोणता खेळाडू सलामीला येणार, याची सर्वात जास्त चर्चा आहे. कारण शिखर धवन हा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या संजूला संधी मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

रोहितबरोबर सलामीला यावेळी संजूपेक्षा लोकेश राहुलला पसंती देण्यात येईल, असे म्हटले जात आहे. कारण राहुलकडे अनुभव आहे आणि त्याने गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. कोहलीचा भरपूर विश्वास रिषभ पंतवर आहे, त्यामुळे त्याला या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते.

पंतनंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतील. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांना 

मी परत येणार! पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात पाऊस बनू शकतो खलनायकभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. पण या सामन्यामध्ये पाऊस हा खलनायक बनू शकतो, असे म्हटले जात आहे.

आज हैदराबादमध्ये पाऊस पडला. त्याचबरोबर उद्याही दिवसभरात हैदराबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे सध्याच्या घडीला वातावरण थोडं थंड असून त्याचा परीणाम खेळपट्टीवर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

खेळपट्टी जर पावसामुळे ओली झाली तर गोलंदाजांचा जास्त फायदा मिळू शकतो. पण दुसरीकडे पाऊस पडला तर त्याचे पाणी मैदानातून किती वेळा बाहेर काढले जाते, यावर सामना होणार की नाही, हे अवलंबून असेल. काहीवेळा पाऊस पडून गेल्यावर फक्त मैदानातून पाणी निर्धारीत वेळेत न काढल्यामुळे सामना रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी हैदराबादमध्ये धुसर दिसणार आहे. त्याचबरोबर सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वेळेमध्ये ५ ते ७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सामन्यातत पावसाचा व्यत्यय येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं. रोहितनं 101 सामन्यांत 2539 धावा केल्या आहेत. कोहली 72 सामन्यांत 2450 धावा केल्या आहेत. विराटला अव्वल स्थानावर पुन्हा कब्जा करण्यासाठी 89 धावांची गरज आहे. ट्वेंटी-20त कोहलीची सरासरी ही 50 इतकी आहे, तर रोहितनं 32.13च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स.

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मारिषभ पंत