Join us  

India Vs West Indies : टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला...

India Vs West Indies : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना होणार आहे. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20नं या दौऱ्याला सुरुवात होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 6:42 PM

Open in App

मुंबई, भारत वि. वेस्ट इंडिज : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना होणार आहे. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20नं या दौऱ्याला सुरुवात होईल. पहिले दोन सामने फ्लोरिडा येथे खेळवण्यात येतील, तर तिसरा सामना गयाना येथे होईल. त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामनेही होणार आहेत. ट्वेंटी-20 मालिकेसाठी कॅप्टन विराट कोहली उत्साही आहे. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारपरिषद घेतली. या परिषदेत कोहली वर्ल्ड कपनंतर सुरु झालेल्या रोहित शर्मा सोबतच्या वादांच्या चर्चांवर काय मत व्यक्त करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि कोहलीनं त्याचे उत्तर दिलं.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. यानंतर या विषयावर विराट काय बोलणार तसेच पत्रकारांना या विषयावरची योग्य ती उत्तरे देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार होते.

त्यावर कोहली म्हणाला,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरणं चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी आहे. ड्रेसिंग रुमचं वातावरणं कसं आहे हे तुम्ही स्वतः येऊ पाहा. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतचे संबंध किती खेळीमेळीचे आहे, हे तुम्ही पाहा.''

'' या बातम्या पेरल्या जात आहे. याचा कोणाला फायदा होतोय हे मलाच कळत नाहीय... गेल्या चार वर्ष आम्ही संघाला 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले, संघात दुफळी असती तर हे शक्य झाले असते का?,'' असेही विराटनं विचारलं. 

टी-20साठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

वन डेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 

कसोटीसाठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव 

ट्वेंटी-20 साठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, किरॉन पोलार्ड, पोव्हमॅन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट ( कर्णधार), किमो पॉल, सुनील नरीन, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस, अँथोनी ब्रॅम्बले, आंद्रे रसेल, खॅरी पिएरे.

वन डेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा