Join us  

India vs West Indies : रोहित शर्माला का दिला डच्चू, विराट कोहलीचा खुलासा

आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात रोहितने दमदार कामिगिरी केली होती. पण तरीही रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आले नाही. याबाबतचा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 6:33 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला. पण या सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून चर्चा आहे ती रोहित शर्माला डच्चू दिल्याची. आपल्या शेवटच्या कसोटी सामन्यात रोहितने दमदार कामिगिरी केली होती. पण तरीही रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्थान देण्यात आले नाही. याबाबतचा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. 

भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारताने 318 धावांनी यजमान विंडीजला नमवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जारोवर भारताने हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम नावावर केले. या सामन्यात कोहलीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. 

रोहितला पहिल्या कसोटी सामन्यात संधी का देण्यात आली नाही. या प्रश्नावर कोहलीने उत्तर दिले. तो म्हणाला की, " संघासाठी हनुमा विहारी हा महत्वाचा खेळाडू आहे. कारण तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो, त्याचबरोबर तो गोलंदाजीतही संघाला हातभार लावतो. त्यामुळे रोहितऐवजी विहारीला संघात स्थान देण्यात आले."

भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. हे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला.

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्मा