India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका

India Vs West Indies: भारतीय संघ वेस्ट इंडिज येथे दाखल झाला असून येथे ते तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:36 PM2019-07-31T13:36:43+5:302019-07-31T13:37:20+5:30

whatsapp join usJoin us
India Vs West Indies: Virat kohli chance to break Mahendra Singh Dhoni's record | India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका

India Vs West Indies : महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाला विराट कोहलीकडून धोका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिजः भारतीय संघ वेस्ट इंडिज येथे दाखल झाला असून येथे ते तीन वन डे, तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर या दौऱ्यावर संघाची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांची नजर असणार आहे. या दौऱ्यातील पहिले दोन ट्वेंटी-20 सामने फ्लोरिडा येथे 3 व 4 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार विराट कोहलीला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर असलेला विक्रम मोडण्याची संधी आहे.

कर्णधार कोहलीनं या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकल्यास सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधाराचा मान त्याला मिळेल. वेस्ट इंडिजवर 2-0 असा विजय मिळवल्यास कोहलीच्या नावावर 28 कसोटी विजय जमा होतील. सध्या महेंद्रसिंग धोनीच्या नावावर 60 कसोटींत 27 विजय आहेत आणि तो भारताचा यशस्वी कर्णधार आहे. कोहलीच्या नावावर 46 कसोटींत 26 विजय आहेत. त्यामुळे कोहलीला धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. 

टीम इंडियाचे यशस्वी कर्णधार 
महेंद्रसिंग धोनी - 60 सामने 27 विजय
विराट कोहली - 46 सामने 26 विजय
सौरव गांगुली - 49 सामने 21 विजय  

याशिवाय फलंदाज म्हणूनही कोहलीला विक्रमाची संधी आहे. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या कोहलीनं या दौऱ्या 88 धावा केल्यावर विश्वविक्रम होईल. 88 धावा करताच विंडीजविरुद्ध 2000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनणार आहे. 

या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

ट्वेंटी-20 मालिका
3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून

वन डे मालिका
8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून
11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून

कसोटी मालिका
22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून

  • टी-20साठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 
  • वन डेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 
  • कसोटीसाठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव 

Web Title: India Vs West Indies: Virat kohli chance to break Mahendra Singh Dhoni's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.