Join us  

India vs West Indies : रोहित शर्माने केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला फक्त १८ धावा करता आल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 4:19 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला फक्त १८ धावा करता आल्या. पण या १८ धावांच्या खेळीमध्येही रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारतीय संघाला गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात लवकरच धक्का बसला. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( 18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतला. केमार रोचच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक शे होप्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण, त्याला बाद देण्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यात चेंडू बॅट अन् पॅडच्या मधून जाताना दिसत होता. पण, तो बॅटीला चाटून गेली की पॅडला याबाबत स्पष्टता नव्हती, तरीही तिसऱ्या पंचांनी रोहितला बाद दिले आणि नेटिझन्सने टीकेची झोड उठवली. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम धोनीच्या नावावर होता. धोनीने ३४५ सामन्यांमध्ये २२५ षटकार लगावले आहे. रोहितने आजच्या सामन्यात षटकार लगावला आणि धोनीशी बरोबरी केली आहे. रोहितने २११ सामन्यांमध्ये २२५ षटकार लगावले आहेत.

टॅग्स :रोहित शर्मामहेंद्रसिंग धोनी