Join us  

India vs West Indies : रोहित शर्माने मागितली रिषभ पंतची माफी

सामन्यानंतर पंतची माफी मागण्याची वेळ रोहित शर्मावर आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 10:19 PM

Open in App

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघातील खेळाडूंमध्ये कधी काय होईल,  हे सांगता येत नाही. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली. या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात रिषभ पंतने दमदार खेळी साकारली. पण या सामन्यानंतर पंतची माफी मागण्याची वेळ रोहित शर्मावर आली.

सामन्यानंतर रोहितने पंतची मुलाखत घेतली. यावेळी रोहितने पंतचा उल्लेख संत असा केला. काही क्षणातच रोहितला आपली ही चूक उमगली आणि त्यानंतर रोहितने पंतची माफी मागितली.

भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने मैदान मारले. विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा विजय पक्का केला.

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन ( 3) लगेच माघारी परतला. लोकेश राहुलही 20 धावा करून बाद झाला. पण, कोहली आणि पंत यांनी संघाचा विजय पक्का केला. कोहलीनं 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या, तर पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. या सामन्यात विश्रांती मिळालेल्या रोहित शर्मानं मॅच संपल्यानंतर बीसीसीआयच्या टीव्हीवर एन्ट्री घेतली. त्यानं सामन्यानंतर रिषभ पंतची मुलाखत घेतली आणि त्यावरून फिरकीपटू युजवेंद्र चहलने हिटमॅनची फिरकी घेत बीसीसीआयला प्रश्न विचारला.

रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रमपंतने नाबाद 65 धावांच्या खेळीसह धोनीचा विक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा धोनीचा विक्रम काल मोडला गेला. धोनीनं 2017मध्ये बंगळुरू येथे इंग्लंडविरुद्ध 56 धावांची खेळी केली होती. भारतीय यष्टिरक्षकाची ती सर्वोत्तम खेळी होती. पण, पंतने मंगळवारी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 65 धावा करून हा विक्रम मोडला. 

टॅग्स :रोहित शर्मारिषभ पंतभारत विरुद्ध वेस्ट इंडिज