India vs West Indies: रोहित, कोहलीची कसोटी लागणार

रोहित शर्मासोबत मतभेद असल्याचे वृत्त भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाकारले आहे. मात्र, हे प्रकरण इतक्या लवकर संपणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 01:44 AM2019-08-04T01:44:47+5:302019-08-04T06:51:52+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: Rohit, Kohli to test | India vs West Indies: रोहित, कोहलीची कसोटी लागणार

India vs West Indies: रोहित, कोहलीची कसोटी लागणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमत

रोहित शर्मासोबत मतभेद असल्याचे वृत्त भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाकारले आहे. मात्र, हे प्रकरण इतक्या लवकर संपणार नाही. वैयक्तिक संघर्षातून नेहमीच रसाळ कथा तयार होतात. संबंधाची स्थिती काहीही असली तरी दोघांनी परिस्थितीचे भान राखावे.
वेस्ट इंडिज्चा संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट यात अनुक्रमे ८, ९ आणि नवव्या क्रमांकावर आहे, तर भारतीय कसोटीत दुसऱ्या, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसºया आणि टी-२० यात तिसºया क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजने गेल्या काही वर्षांत अपेक्षेप्रमाणे विजय मिळविलेले नाहीत.

कागदावर भारतीय संघ मजबूत असला तरी काही बाबी भारतीय संघाला एका मर्यादेत ठेवतात. बुमराह याला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर आहे. धोनीदेखील सैन्यदलासोबत आहे. या खेळाडूंना चांगला पर्याय मिळायला हवा.

भारतीय संघात अनेकजण आहेत. मात्र, ते नवीन आहेत. जसे चहर बंधू आणि सैनी पुनरागमन करत आहेत. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर हे भारतीय संघात गुणवत्ता असलेले खेळाडू आहेत. मात्र, भारतीय क्रिकेटमधील खोली दर्शवतात. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. त्यामुळे संघाला काही प्रमाणात तरी असुरक्षितता मिळते.

कोहली विश्वचषकात शतकी खेळी करण्यात अपयशी ठरला. तरीही त्याचे नेतृत्व या काळात चांगले बहरले. कोहलीची भूमिका ही रणनीतीकाराची आहे. रोहितला कसोटी संघात नियमित जागा मिळवणे हे त्याच्यासमोरील मोठे आव्हान आहे. त्याने आतापर्यंत फक्त २७ कसोटी सामने खेळले आहेत.

Web Title: India vs West Indies: Rohit, Kohli to test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.