Join us  

India vs West Indies : 140 किलो वजनाच्या अष्टपैलू खेळाडूबद्दल विंडीज बोर्डाचं मोठं विधान

 भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 1:20 PM

Open in App

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज :  भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाने शनिवारी 13 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यांनी 26 वर्षीय राहकीम कोर्नवॉलला कसोटीत खेळण्याची संधी दिली आहे, तर अनुभवी फलंदाज ख्रिस गेलला वगळले आहे. 22 ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून 6 फुट उंच आणि 140 किलो वजनाचा 'अगडबंब' कोर्नवॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.  विंडीज संघात समावेश करण्यात आलेल्या कोर्नवॉलच्या वजनाचीच अधिक चर्चा रंगत आहे. त्यात विंडीज क्रिकेट मंडळाचे प्रमुख रिकी स्केरिट यांनी कोर्नवॉलबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. स्केरिट यांनी सांगितले की,''26 वर्षीय कोर्नवॉल वजन कमी करणार आहे. विंडीज क्रिकेट मंडळाच्या प्रशिक्षणाच्या मार्गदर्शनाखाळी कोर्नवॉल वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याने 17 वेळा पाच विकेट्स आणि 2 वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. भारत अ विरुद्धच्या सामन्यातही त्याची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. ''   

 2016मध्ये वेस्ट इंडिज एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना सराव सामन्यात कोर्नवॉलने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला बाद केले होते. त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. फिरकी गोलंदाजीसह कोर्नवॉल फलंदाजीतही उपयुक्त खेळी करू शकतो. त्यानं आतापर्यंत खेळलेल्या 55 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 97 डावांत 24.43च्या सरासरीनं 2224 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक व 13 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 54 झेलही टीपले आहेत.   त्याने 23.90च्या सरासरीनं 260 विकेट्स घेतल्या आहेत.  कसोटीसीठी वेस्ट इंडिजचा संघ जेन होल्डर ( कर्णधार ), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, राहकीम कोर्नवॉल, शेन डॉवरीच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजवेस्ट इंडिज