Join us  

India vs West Indies ODI : भारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 10:58 AM

Open in App

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत भारतीय संघात केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी हे परतणार आहेत. पण, अजूनही भारतीय संघाला मधल्या फळीसाठीचा सक्षम पर्याय शोधता आलेला नाही. याही मालिकेत चौथ्या स्थानासाठी संघात प्रयोग होताना पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको. 

बीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'!

India vs West Indies ODI : भारताकडे प्रयोग करण्याची संधी

भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून हार मानावी लागली होती. त्या संपूर्ण स्पर्धेत मधल्या फळीचे अपयश भारतासाठी डोकेदुखी ठरले होते. त्यानंतर भारत प्रथमच वन डे सामना खेळणार आहे. त्यामुळे आज कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरला ट्वेंटी-20 मालिकेत संधी मिळाली नव्हती, पण त्याला वन डे संघात स्थान मिळू शकते. मधल्या फळीसाठी अय्यर, लोकेश राहुल आणि मनिष पांडे यांच्यात शर्यत पाहायला मिळेल. वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतीमुळे माघारी परतलेला शिखर धवन पुन्हा वन डेत सलामी करण्यासाठी उत्सुक आहे. वेस्ट इंडिज संघाला वर्ल्ड कपमध्ये ठिकठाक कामगिरी करता आली आहे. ख्रिस गेलची ही अखेरची वन डे मालिका असल्यानं त्याच्याकडून स्फोटक फलंदाजी अपेक्षित आहे. 

  • वन डेसाठी भारतीय संघ  - विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 
  • वन डेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच.
  • वन डे मालिका

8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून

  • थेट प्रक्षेपण - Sony 1/HD आणि 3/HD,  SonyLIV
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीख्रिस गेलरोहित शर्माशिखर धवनलोकेश राहुलकेदार जाधव