Join us  

India vs West Indies ODI: विराट कोहलीला आज 26 वर्षाचा 'हा' विक्रम मोडीत काढण्याची संधी

भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 11:36 AM

Open in App

पोर्ट अ‍ॅाफ स्पेन : भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट अ‍ॅाफ स्पेन मैदानात रंगणार आहे. तसेच हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला नवीन इतिहास रचण्याची संधी उपलब्ध असणार आहे. 

कोहलीला पावसामुळे पहिला वन डे सामना रद्द झाल्याने फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र आज रंगणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात त्याने 19 धावा केल्या तर पाकिस्तानचा फलंदाज जावेद मियादादला मागे टाकून वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे सामन्यात सार्वाधिक धावा करणारा फलंदाजाचा विश्वविक्रम आपल्या नावावर करु शकतो. 

जावेद मियादाद वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा वन डे सामना 1993मध्ये खेळला होता. तसेच त्याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या 64 वन डे सामन्यात 1930 धावा केल्या आहेत.  तर विराट कोहलीने वेस्ट इंडिज विरुद्ध 33 वन डे सामन्यात 1912 धावा केल्या आहेत. त्यामुळे कोहलीने आज 19 धावा केल्यास 26 वर्ष मियादादचा असलेला विक्रम कोहलीच्या नावावर होणार आहे. 

संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीजावेद मियादाद