Join us  

India vs West Indies : महेंद्रसिंग धोनी तिसऱ्यांदा स्टम्पिंग होताना वाचला, होपने दिले जीवदान

जेव्हा होपच्या हातामध्ये चेंडू आला तेव्हाही धोनी क्रिझच्या बाहेर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 5:58 PM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्यांदा स्टम्पिंग होणार होता. पण यावेळी त्याला जीवदान दिले ते वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक शाई होपने. पण नेमके घडले तरी काय ते जाणून घ्या...

ही गोष्ट घडली ती ३४व्या षटकात. यावेळी फिरकीपटू फॅबियन अॅलेन गोलंदाजी करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनी मोठा फटका मारण्यासाठी पुढे सरसावला. पण यावेळी चेंडूने धोनीला चकवा दिला आणि चेंडू यष्टीरक्षक होपच्या दिशेने गेला. हा चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. त्यामुळे हा चेंडू थेट होपच्या हातामध्ये आला नाही. हा चेंडू जेव्हा होपच्या हातामध्ये आला तेव्हा धोनीला आपल्याकडून चेंडू हुकला आहे, हे समजले. धोनी तेव्हा मागे फिरण्यासाठी तयार झाला. जेव्हा होपच्या हातामध्ये चेंडू आला तेव्हाही धोनी क्रिझच्या बाहेर होता. पण तरीही होपला धोनीला यष्टीचित करता आले नाही.

धोनी हा स्वत: एक निष्णात यष्टीरक्षक आहे. त्यामुळे धोनी आतापर्यंत जास्त वेळा यष्टीचीत झाल्याचे पाहायला मिळालेले नाही. यापूर्वी धोनी फक्त दोनदा स्टम्पिंग झाला आहे. पण या सामन्यात जर होपने संधीचे सोने केले असते तर धोनी तिसऱ्यांदा स्टम्पिंग झाला असता.

विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागेभारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत. 

तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा होत्या. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो. पण आता कोहली या यादीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, कारण २० हजार आंतरराष्ट्रीय धावा ४१६ सामन्यांमध्ये पूर्ण केल्या आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीवर्ल्ड कप 2019