Join us  

India vs West Indies : भारताच्या लोकेश राहुलचा विक्रम; झळकावले अर्धशतक

राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. कोहलीपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 9:39 PM

Open in App
ठळक मुद्दे या सामन्यामध्ये राहुल हा हजारी मनसबदार ठरला आहे.

हैदराबाद : भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम रचला आहे. या सामन्यामध्ये राहुल हा हजारी मनसबदार ठरला आहे.

वेस्ट इंडिजच्या २०८ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माच्या रुपात भारताला लवकर धक्का बसला. पण त्यानंतर राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. कोहलीपेक्षा अधिक आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात राहुलने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. भारताकडून ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये एक हजार धावांचा पल्ला गाठणारा तो सातवा खेळाडू ठरला.

वेस्ट इंडिजची धडाकेबाज फलंदाजी; भारतापुढे २०८ धावांचे आव्हानवेस्ट इंडिजच्या फलंदाजांना झंझावाती फलंदाजी करत पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतापुढे 208 धावांचे आव्हान ठेवले.

भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईसने तुफानी फटकेबाजी करत फक्त १७ चेंडूंमध्ये ४० धावांची लूट केली. त्याला फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. लुईसनंतर वेस्ट इंडिजचा शिमरोन हेटमायर चांगलाच तळपला. हेटमायरने षटकारासह आपले अर्धशतक दिमाखात साजरे केले. हेटमारने ४१ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावा केल्या हेटमायर बाद झाल्यावर एका चेंडूनंतर किरॉन पोलार्डही ३७ धावांवर बाद झाला. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने हे दोन्ही बळी मिळवून दिले.

'बर्थ डे बॉय'ने मिळवून दिले भारताला मोठे यशभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आपल्या वाढदिवशी एका खेळाडूने भारताला मोठे यश मिळवून दिल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूने हा बळी मिळवत स्वत:लाच स्पेशल गिफ्ट दिले आहे.

वेस्ट इंडिजच्या इव्हिन लुईसने संघाला झोकात सुरुवात करून दिली. लुईस बाद झाल्यावर शिमरोन हेटमायरल दमदार फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूने ब्रेंडन किंग भारताच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करत होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजाने त्याचा काटा काढला. किंगला यावेळी ३१ धावांवर जडेजाने बाद केले. आज जडेजाचा वाढदिवस आहे.

रिषभ पंतला का मिळाले पहिल्या सामन्यात स्थान; विराट कोहलीचा खुलासाभारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० रिषभ पंतला संधी द्यायची की संजू सॅमसनला, यावर बरीच चर्चा सुरु होती. पण अखेर सॅमसनला डावलून पंतला संघात स्थान देण्यात आले. पण पंतला या सामन्यात का स्थान देण्यात आले, याबाबतचा खुलासा भारताचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे.

पंतबाबत विराट कोहली म्हणाला की, " पंत हा एक युवा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला जर संघातून वगळले तर ते योग्य होणार नाही. त्याला संघात स्थान दिल्यावर जे काही होईल, त्यासाठी संघ व्यवस्थापन जबाबदार असेल. या गोष्टीचा अर्थ असा होत नाही की पंतला पर्याय नाही. भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षाही चांगले गुणवान खेळाडू आहेत." 

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या संघात कोणाची एंट्री आणि कोणाला डच्चू; जाणून घ्या...भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याला काही मिनिटांतच सुरुवात होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या सामन्यासाठी भारताच्या संघात नेमके कोणला स्थान मिळाले आहे ते जाणून घ्या...

या सामन्यासाठी रोहित शर्माबरोबर सलामीला लोकेश राहुल येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली फलंदाजीला येईल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रने श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा हे दोघे बर्थ डे बॉय येणार आहेत. त्यानंतर शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा क्रमांक येतो.

या सामन्यामध्ये तीन गोलंदाजांना संधी दिली आहे. या संघात भुवनेश्वर कुमारचे पुनरागमन झाले आहे, त्याचबरोबर दीपक चहल आणि युजवेंद्र चहल यांना संघात स्थान मिळाले आहे. 

टॅग्स :लोकेश राहुलविराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज