Join us  

India vs West Indies: एक षटकार अन् रोहित शर्मा बसणार विक्रमाच्या शिखरावर! 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 12:05 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करण्याची संधी आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं बोललं जात आहे. पण, या पावसाएवजी रोहितच्या बॅटीतून पडणारा धावांचा पाऊस पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. या सामन्यात एक षटकार खेचल्यास रोहित एका अनोख्या विक्रमांच्या शिखरावर जाऊन बसेल.

या सामन्यात रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा विक्रम सर करण्याची संधी आहे. सध्या रोहितच्या नावावर 399 षटकार आहेत आणि एक षटकार त्याला विक्रमाच्या शिखरावर बसवू शकतो. अशी कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच भारतीय फलंदाज आहे. जगात केवळ पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी ( 476) आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ( 534)  या दोन फलंदाजांनी 400 पेक्षा अधिक षटकार खेचले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं. रोहितनं 101 सामन्यांत 2539 धावा केल्या आहेत. कोहली 72 सामन्यांत 2450 धावा केल्या आहेत. 

  • भारतीय संघ ट्वेंटी-20 - विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
  • वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स, 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माख्रिस गेलशाहिद अफ्रिदी