Join us  

India vs West Indies, 3 ODI : यंदाचा 15 ऑगस्ट टीम इंडियासाठी असेल खास; विराटसेना घडवणार का नवा इतिहास?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : यंदाचा स्वातंत्र्यदिन भारतीय क्रिकेट संघासाठी खास ठरू शकतो. भारतीय संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच देशवासियांना विजयी भेट देऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 3:42 PM

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : यंदाचा स्वातंत्र्यदिन भारतीय क्रिकेट संघासाठी खास ठरू शकतो. भारतीय संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच देशवासियांना विजयी भेट देऊ शकतो. कारण, 72 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाला 15 ऑगस्टला झालेल्या एकही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही आणि यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा कटू इतिहास पुसून टाकण्याची संधी टीम इंडियाला आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वन डे सामना आज म्हणजे 14 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. पण, त्याचा निकाल भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री म्हणजे 15 ऑगस्टला लागणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि तिसरा सामना जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घालण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.  भारतीय संघाने आतापर्यंत 15 ऑगस्टला पाच सामने खेळले आहेत आणि हे सर्व कसोटी सामने आहेत.  

 - 15-18  ऑगस्ट 1936, विरुद्ध इंग्लंड, ओव्हल इंग्लंड 9 विकेटने विजयी - 14-19 ऑगस्ट 1952, विरुद्ध इंग्लंड- ओव्हलसामना अनिर्णित- 14-17 ऑगस्ट 2001, विरुद्ध श्रीलंका- गॉलश्रीलंका 10 विकेट्सने विजयी-15-17 ऑगस्ट 2014, विरुद्ध इंग्लंड - ओव्हलइंग्लंड एक डाव व 244 धावांनी विजयी-12-15 ऑगस्ट 2015, विरुद्ध श्रीलंका- गॉलश्रीलंका 63 धावांनी विजयी 

प्रजासत्ताक दिनीही वन डे सामन्यात भारताला विजय मिळवता आलेला नाही. 1986 साली अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाने भारतावर 36धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2000मध्येही ऑस्ट्रेलियाकडूनच भारताला 152 धावांनी हार पत्करावी लागली होती. 2015मध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिला होता. दुसरीकडे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताने 26 जानेवारी 2016 मध्ये भारताने अॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियावर 37 धावांनी विजय मिळवला होता. पण, पुढच्याच वर्षी कानपुर येथील सामन्यात इंग्लंडने 7 विकेट राखून विजय मिळवला होता.

संभाव्य संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, लोकेश राहूल, मनिष पांडे, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी

वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायेर, निकोलस पुरन, रोस्टन चेस, फॅबियन अ‍ॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, केमार रोच

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीस्वातंत्र्य दिन