Join us  

India vs West Indies: विराटनं केलं चाहत्यांना निराश, नाणेफेक झाल्यानंतर केली नकोशी घोषणा

भारत विरुद्ध  वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-20 सामना तिरुअनंतपूरम येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 6:46 PM

Open in App

भारत विरुद्ध  वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-20 सामना तिरुअनंतपूरम येथे होणार आहे. हा सामना जिंकून  मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाला आहे; त्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका सुधारण्याचे आव्हानदेखील असेल. भारताने मागील 13 महिन्यांत विंडिज विरुद्ध 6 ट्वेंटी-20 सामने जिंकले. विराट कोहलीची नजर सलग सातव्या विजयावर असेल. पहिला सामना भारताने 6 विकेट्सनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळविली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-20त टीम इंडिया मालिका विजयाच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पण, त्यानंतर कर्णधार विराटनं केलेल्या एका घोषणेनं चाहत्यांना निराश केलं. भारतीय संघ या सामन्यासाठी केरळ येथे दाखल होताच संजू सॅमसनच्या नावाचा जयघोष होताना पाहायला मिळाला होता. शिवाय खेळाडू सराव करतानाही संजू सॅमसनचाच गजर होता. त्यामुळे त्याला आजच्या सामन्यात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण, विराटनं नाणेफेक झाल्यानंतर संघात बदल नसल्याचं जाहीर करताच चाहत्यांची घोर निराशा झाली. वेस्ट इंडिजनं संघात एक बदल करताना दिनेश रामदिनच्या जागी निकोलस पूरणला पाचारण केले.

भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल वेस्ट इंडिज - लेंडल सिमन्स, एव्हिन लुईस, ब्रेंडन किंग, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, किरॉन पोलार्ड, जेसन होल्डर, खॅरी पिएर, केस्रीक विलियम्स, शेल्डन कोट्रेल, हेडन वॉल्श ज्युनियर.  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहली