Join us  

India vs West Indies 2nd ODI: कोहलीने 42वे शतक ठोकत रचले बरेच विक्रम

या सामन्यात कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावांची खेळी साकारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 10:21 PM

Open in App

पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 42वे शतक साजरे केले. पण हे 42वे शतक साजरे करताना कोहलीने बऱ्याच विक्रमांना गवसणी घातली आहे. या सामन्यात कोहलीने 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावांची खेळी साकारली.

कोहलीने रचला इतिहास

कोहलीने या सामन्यात 19 धावा जेवहा केल्या, तेव्हा त्याने इतिहास रचला. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा कोहली हा अव्वल फलंदाज ठरला. कोहलीने यावेळी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांना पिछाडीवर सोडले. मियांदाद यांच्या नावावर 1930 धावा होत्या. या धावा त्यांनी 64 डावांमध्ये केल्या होत्या. कोहलीने मात्र हा धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना कोहली मियांदाद यांच्यापेक्षी 34 डाव कमी खेळला आहे.

सौरव गांगुलीचाही विक्रम मोडला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी कोहली 11, 286 धावांवर होता. पण या सामन्यात दमदार खेळी साकारताना कोहलीने गांगुलीला पिछाडीवर टाकले आहे. कारण गांगुलीच्या 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11,363 धावा होत्या. या धावा कोहलीने आजच्या खेळीमध्ये ओलांडल्या आहेत. आता सर्वाधिक धावांच्या यादीत कोहलीच्या पुढे सात खेळाडू आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनच्या नावावावर 18, 426 धावा आहेत. 

जलद दोन हजार धावांचा विक्रमप्रतिस्पर्धी संघाविरुद्ध सर्वात जलद दोन हजार धावा करणारा कोहली हा भारताचा अव्वल खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्माने 37 डावांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. पण या सामन्यात कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन हजार धावा पूर्ण केल्या त्या 34 डावांमध्ये.

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतकेकोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक आठ शतके लगावली आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हशिम अमलाच्या नावावर होता.

रिकी पाँटिंगलाही पिछाडीवर सोडलेएक कर्णधार म्हणून एका संघाविरुद्ध शतके लगावण्याचा विक्रमही आता कोहलीच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर होता. रिकी पाँटिंगने न्यूझीलंडविरुद्ध पाच शतके लगावली होती. पण कर्णधार म्हणून कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध सहावे शतक लगावले आहे. 

Image result for kohli odi century

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज