Join us  

India vs West Indies, 2nd ODI: रोहितची कर्णधार कोहलीवर कुरघोडी, 2019मध्ये कुणालाच जमली नाही अशी कामगिरी

तुर्तास तरी हिटमॅन रोहितनं या शर्यतीत बाजी मारली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 2:30 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील दुसर सामना सुरू आहे. 2019 या मालिकेतील ही टीम इंडियाची अखेरची वन डे मालिका आहे. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा यांच्यात शर्यत पाहायला मिळणार आहे. रोहितनं वन डे वर्ल्ड कप स्पर्धा गाजवली, त्या तुलनेत विराटला अजूनही दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे वर्षाअखेरीत ती उणीव भरून काढत क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या खेळीनं मंत्रमुग्ध करण्यासाठी विराट उत्सुक आहे. पण, तुर्तास तरी हिटमॅन रोहितनं या शर्यतीत बाजी मारली आहे. 

या मालिकेपूर्वी वन डे क्रिकेट स्पर्धेत 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट अव्वल स्थानी होता. त्याच्या नावावर 23 सामन्यांत 64.40च्या सरासरीनं 1288 धावा होत्या. या शर्यतीत रोहित 1232 धावांसह दुसऱ्या स्थानावर होता. रोहितनं 25 सामन्यांत 53.56च्या सरासरीनं या धावा केल्या होत्या. त्यामुळे या मालिकेनंतर या क्रमवारीत अदलाबदल होते, की स्थान तसेच राहते, याची उत्सुकता लागली होती. विराटला पहिल्या वन डे सामन्यात केवळ चार धावा करता आल्या, तर रोहितनं 36 धावा केल्या.

आज दुसऱ्या सामन्यात रोहितनं 33 धावांची भर घालून 2019मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत अव्वल स्थान पटकावले. रोहितच्या नावावर आता 1300 धावा झाल्या आहेत, तर विराट 1292 धावांसह दुसऱ्या स्थानावर गेला आहे. या कामगिरीसह त्यानं लिस्ट ए क्रिकेटमध्ये 11000 धावांचा पल्लाही पार केला.

विराट कोहलीनं रचला इतिहास; दिग्गजांच्या पंक्तित स्थान

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिजनं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाला या सामन्यात गोलंदाजी संयोजनात सुधारणा करावी लागणार आहे. याही सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला. कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा प्रथम फलंदाजी करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इतिहास रचला.

विशाखापट्टणमची खेळपट्टी ही विराटसाठी नेहमी खास राहिली आहे. येथे खेळलेल्या पाच सामन्यांत कोहलीनं अनुक्रमे 118, 117, 99, 65 आणि नाबाद 157 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून तुफानी खेळीची अपेक्षा आहे. आजचा हा सामना हा कोहलीचा 400वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हा पल्ला गाठणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या विक्रमात महान फलंदाज सचिन तेंडुलकर 664 सामन्यांसह आघाडीवर आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( 538), राहुल द्रविड ( 509), मोहम्मद अझरुद्दीन ( 433), सौरव गांगुली ( 424), अनील कुंबळे ( 403), युवराज सिंग ( 402) यांनी चारशे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहली