Join us  

India vs West Indies, 2 nd test : पंचांनी नॉट आऊट दिल्यावरही झाली बुमराची हॅट्रिक; नेमका काय घोळ आहे...

मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नव्हते, पण तरीही बुमराने ही हॅट्रिक साजरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये गोलमाल नक्की आहे तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 1:32 PM

Open in App

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दुसऱ्या कसोटी सामन्यात हॅट्रिक साजरी केली. पण यावेळी मैदानावरील पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नव्हते, पण तरीही बुमराने ही हॅट्रिक साजरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये गोलमाल नक्की आहे तरी काय...

या सामन्याच्या नवव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बुमराने डॅरेन ब्राव्होला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर बुमराने ब्रुक्सला पायचीत बाद केले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बुमराने रोस्टन चेसविरुद्ध LBWची अपील केली. पण मैदानावरील पंचांनी चेसला नाबाद ठरवले होते. पण त्यानंतरही बुमराची हॅट्रिक झाली तरी कशी जाणून घ्या...

बुमराने चौथ्या चेंडूवर पंचांकडे दाद मागितली, पण त्यांनी चेस बाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बुमरा कोहलीच्या दिशेने गेला. त्यावेळी बुमराने हा रीव्ह्यू घ्यायलाच हवा, असे त्याने कोहलीला सांगितले. त्यावेळी कोहलीने रीव्ह्यू घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेस बाद असल्याचे जाहीर केले. 

भारताला 'हा' पराक्रम करायला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागलीसध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात एक पराक्रम पाहायला मिळाला. पण हा पराक्रम पाहण्यासाठी भारताला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली.

भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये दादा समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा आहे. पण गेल्या 13 वर्षांमध्ये भारतालाही गोष्ट करता आली नव्हती. गेल्या 13 वर्षांमध्ये भारताने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच विजय मिळवले. मालिकाही जिंकल्या, पण हा पराक्रम करायला तब्बल एका तपापेक्षा जास्त काळ जावा लागला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्रिक मिळवली. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर हॅट्रिक पटकावणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पण भारताला कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 13 वर्षांनी हॅट्रिक पाहण्याचा योग आला. कारण यापूर्वी इरफान पठाणने कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 2006 साली हॅट्रिक मिळवली होती. भारताकडून पहिली हॅट्रिक फिरकीपटू हरभजन सिंगने कोलकाता येथे 2001 साली पटकावली होती.

बुम... बुम... बुमरा... वेस्ट इंडिजच्या धर्तीवर रचला इतिहासदुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वेस्ट इंडिजच्या धर्तीवर एक इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर असा पराक्रम करणारा बुमरा हा आतापर्यंतचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

बुमराने वेस्ट इंडिजच्या सहा फलंदाजाना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले. पण बुमराने या सामन्यात हॅट्रीकही साधली आहे. आतापर्यंत तो भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारली होती.

बुमरा हा वेस्ट इंडिजच्या धर्तीवर कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कारण हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि इरफानने पाकिस्तानविरुद्ध हॅट्रिक साकारली होती. पण वेस्ट इंडिजच्या धर्तीवर एकाही भारतीय गोलंदाजांना हॅट्रिक साकारता आली नव्हती. त्यामुळे बुमराने ही वेस्ट इंडिजच्या धर्तीवर हॅट्रिक साकारत इतिहास रचला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराह