Join us  

India vs West Indies, 1st Test : माझा रेकॉर्ड मोडूनंच दाखवा, वसिम जाफरचे टीम इंडियाला चॅलेंज

भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने भारताच्या फलंदाजांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे. माझा रेकॉर्ड मोडूनंच दाखवा, असे चॅलेंज त्याने भारताच्या फलंदाजांना दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 5:12 PM

Open in App

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. पण भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने भारताच्या फलंदाजांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे. माझा रेकॉर्ड मोडूनंच दाखवा, असे चॅलेंज त्याने भारताच्या फलंदाजांना दिले आहे. पण जाफरचा हा विक्रम आहे तरी काय, जाणून घ्या...

जाफरने 2006 साली झालेल्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात जाफरने 212 धावांची खेळी साकारली होती. याबाबत जाफरने एक टि्वट केले आहे. यामध्ये जाफर म्हणाला की, " मी 2006 साली झालेल्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात 212 धावांची खेळी साकारली होती. या खेळीमध्ये मी एक षटकारही मारला होता. माझा विक्रम या दौऱ्यात कुणीतरी मोडीत काढेल, अशी मला आशा आहे."

विराट कोहलीवर भडकले सुनील गावस्करभारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी समालोचन करताना गावस्कर यांनी कोहलीवर तोफ डागली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला फक्त 9 धावा करता आल्या. यावेळी एका उसळत्या चेंडूवर कोहली बाद झाला. सामना सुरु होण्यापूर्वी कोहलीने मला मैदानात आल्यावर लगेचच बाऊन्सर टाका, असे सांगितले होते. पण यावेळी उसळत्या चेंडूवरच तो बाद झाल्याचे पाहायला मिळाले.

समालोचन करताना गावस्कर कोहलीवर आणि रवी शास्त्री यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला, त्यावर गावस्कर रागावलेले पाहायला मिळाले.

गावस्कर म्हणाले की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आर. अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहीलेला आहे, त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर त्याची कामगिरी उजवी राहीलेली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान न देणे, हे धक्कादायक आहे."

अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 कसोटी सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 60 बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही.

 बाऊन्सरला घाबरत नाही म्हणणारा कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाला फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सर टाका, असं विधान करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली तोंडघशी पडला आहे. कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर यावेळी काही बाऊन्सर्सचा समर्थपणे सामना कोहलीला करता न आल्याचेच पाहायला मिळाले.

कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9 धावा केल्या, यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. कोहली आता आक्रमकपणे फलंदाजी करणार, असे वाटत असताना कोहली वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर आऊट झाला. गॅब्रियलने एक उसळता चेंडू कोहलीच्या ऑफ स्टम्पच्या दिशेने टाकला. कोहली हा चेंडू मारण्यासाठी गेला आणि त्याचा झेल गलीमध्ये उभ्या असलेल्या ब्रुक्सने पकडला. बाद होण्यापूर्वी कोहलीला काही बाऊन्सर्स टाकण्यात आले. यावेळी कोहलीला या बाऊन्सर्सचा सामना कोहलीला समर्थपणे करता आला नसल्याचेच पाहायला मिळाले.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीसुनील गावसकर