Join us  

विराटचा नवा विक्रम, अशी कामगिरी करणारा कोहली एकमेव

ट्‌वेंटी-20, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या भारतीय संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवीन विक्रम आपल्या नावे करतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2017 8:17 AM

Open in App
ठळक मुद्देप्रत्येक आघाडीवर यजमान संघाला अडचणीत आणणा-या टीम इंडियाने पहिल्या कसोटीत चौथ्याच दिवशी 304 धावांनी शानदार विजय साकारला.पहिल्या कसोटी विजयासह विराट कोहलीनं अनेक विक्रमाला गवसणी घातलीदुसऱ्या कसोटी विराट कोहली सुनील गावस्करांचा विक्रमही मोडण्याची शक्यता

कोलंबो, दि. 30 - ट्‌वेंटी-20, एकदिवसीय आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारच्या भारतीय संघाचे नेतृत्व करणारा विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवीन विक्रम आपल्या नावे करतोय. लंकेविरोधात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या डावात आपलं शतक साजरं केलं. त्याने 136 चेंडुंत 103 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या शतकानंतर कसोटी मध्ये त्याची सरासरी 50.03 झाली आहे. कसोटी, ट्‌वेंटी-20 आणि एकदिवसीयमध्ये 50च्या वर सरासरी असणारा कोहली एकमेव खेळाडू आहे. सध्याच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अशी कामगीरी फक्त कोहलीच्या नावावर आहे. काल झालेल्या कसोटीमध्ये कोहलीच्या नावे अनेक विक्रम झाले. त्यापैकी हा एक महत्वपुर्ण विक्रम आहे.कसोटीमध्ये कोहलीची सरासरी 50.03 आहे. तर एकदिवसीयमध्ये 54.68 आणि ट्‌वेंटी-20 52.96 अशा सरासरीने तो धावा काढतोय. हा पराक्रम करुन कोहलीनं जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटचे नाव उंचवले आहे.  कोहलीने कर्णधार म्हणून विदेशात सर्वाधिक वेगवान 1000 धावा काढल्या. त्याने17 डावांत ही कामगिरी केली आहे. याआधी सचिन तेंडुलकरने 19 डावांत विदेशात जलद एक हजार धावांचा टप्पा गाठला होता.प्रत्येक आघाडीवर यजमान संघाला अडचणीत आणणा-या टीम इंडियाने पहिल्या कसोटीत चौथ्याच दिवशी 304 धावांनी शानदार विजय साकारला. या विजयामुळे दोन वर्षांपूर्वी याच मैदानावर झालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता करीत, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. लंकेला त्यांच्याच घरात पराभूत करत विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. कोणते आहेत विक्रम ते जाणून घेऊयात.-  शतकी खेळीदरम्यान कोहलीने माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (११६ कसोटी) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण (१३४ कसोटी) यांच्या प्रत्येकी १७ शतकांची बरोबरी केली. कोहलीने ५८ व्या षटकांत ही किमया साधली.- वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध भारताने ६१७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताची लंकेविरुद्धची ६०० ही सर्वांत मोठी धावसंख्या आहे.- कोहली- रहाणे यांनी चौथ्या गड्यासाठी ५१ धावांची नाबाद भागीदारी केली. भारतासाठी कसोटीत २००० किंवा त्याहून अधिक धावा काढणारी १४ वी जोडी ठरली.- कर्णधार म्हणून ४४ डावांमध्ये १० वे कसोटी शतक ठोकताना विराटने माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनचा (६८ डावांमध्ये ९ शतके) विक्रम मोडला. या यादीमध्ये सर्वांत आघाडीवर सुनील गावस्कर आहेत. विराटला गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची संधी आहे. गावस्कर यांनी कर्णधार म्हणून ७४ डावांमध्ये ११ शतके ठोकली आहेत.- ३०४ धावांनी मिळवलेला विजय हा भारताचा विदेशी भूमीवरील सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी, भारताने १९८६ मध्ये इंग्लंडचा हेडिंग्ले येथे २७९ धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीत भारताचा हा चौथा मोठा विजय आहे.- 0 (शून्य) वेळा एवढ्या मोठ्या फरकाने श्रीलंकेचा पराभव झाला होता. याआधी, श्रीलंकेचा सर्वांत मोठा पराभव पाकविरुद्ध १९९४ मध्ये झाला होता. विशेष म्हणजे, श्रीलंकेचे तीन मोठ्या पराभवांपैकी दोन पराभव हे याच वर्षी झाले. केपटाउन येथे जानेवारीत त्यांना २८२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.- 0३ विजय नोंदवत कर्णधार म्हणून विराट कोहलीने श्रीलंकेतील विजयाच्या रिकी पॉटिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली.- आॅस्ट्रेलियाने २००३-०४ मध्ये श्रीलंकेचा ३-० ने पराभव करीत एकतर्फी मालिका जिंकली होती. भारताच्या इतर सर्व कर्णधारांनी मिळून १८ कसोटी सामन्यांतून केवळ ४ विजय नोंदवले आहेत.- ५५० हे भारताने उभे केलेले लक्ष्य हे सर्वात मोठे दुसरे लक्ष्य आहे. याआधी हा आकडा ६१७ एवढा होता. २००८-०९ मध्ये न्यूझीलंविरुद्ध वेलिंग्टन येथे भारताने ही धावसंख्या उभारली होती. हा सामना अनिर्णित झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० आणि त्यापेक्षा अधिक धावसंख्या भारताने पाचव्यांदा उभारली आहे.- भारताने गाले कसोटी सामन्यांत श्रीलंकेचा चौथ्या दिवशी ३०४ धावांनी पराभव केला. धावांचा विचार करता भारताचा विदेशातील हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने १९८६ मध्ये लीड््स कसोटीमध्ये इंग्लंडचा २७९ धावांनी पराभव केला होता. भारताने श्रीलंकेपुढे ५५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंका संघाचा दुसरा डाव २४५ धावांत संपुष्टात आला. भारताने पहिल्या डावात ६०० धावांची मजल मारली होती.