Join us  

India Vs Sri Lanka, Latest News : रोहितची विश्वचषकातली सहा शतके, पाहा फक्त एका क्लिकवर

रोहितने एकूण विश्वचषकात सहा शतके लगावत भाराचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या सहा शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:25 PM

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आतापर्यंत रोहित शर्माने विश्वचषकात सहा शतके झळकावली आहे. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला विश्वचषकात यापेक्षा जस्त शतके लगावता आलेली नाही. रोहितने एकूण विश्वचषकात सहा शतके लगावत भाराचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या सहा शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पण रोहितची ही सहा शतके फक्त एका क्लिकवर तुम्हा पाहू शकता...

रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहास

विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती.

अर्धशतकासह रोहित शर्मा पुन्हा ठरला अव्वलश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आता या सामन्यातही शतक झळकावत रोहित क्रिकेट विश्वातील इतिहासाला गवसणी घालणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

श्रीलंकेने भारतापुढे विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहितने अर्धशतक झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. या अर्धशतकासह रोहित यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी या यादीमध्ये बांगलादेशचा शकिब अल हसन हा ६०६ धावांसह अव्वल स्थानावर होता. त्यावेळी रोहित हा ५४४ धावांसह दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या सामन्यात ६३ धावा करत रोहितने या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''

भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.'' 

टॅग्स :रोहित शर्मासचिन तेंडुलकरवर्ल्ड कप 2019