Join us  

India Vs Sri Lanka, Latest News : सलग तीन सामन्यात शतके विश्वचषकात रोहित शर्मा ठरला दुसराच फलंदाज

रोहित मात्र दुसराच भारतीय फलंदाज ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 11:08 PM

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोहित शर्मा याने विश्वचषकात श्रीलंकेविरोधात शतक झळकावताच तो विश्वक्रिकेटमध्ये मानाच्या पंक्तीत पोहचला. सलग तीन सामन्यात शतके झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याची नोंद झाली. त्याच्याआधी अशी कामगिरी १० फलंदाजांनी केली होती. तो मात्र दुसराच भारतीय फलंदाज ठरला.

 विराट कोहली याने त्याच्या आधी २०१८ मध्ये वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात ही कामगिरी केली होती. रोहित याने इंग्लंड विरोधात १०२, बांगलादेशविरोधात १०३ आणि श्रीलंकेविरोधात १०३ धावा केल्या. त्यासोबतच त्यानेही कामगिरी देखील केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगीरी सर्वप्रथम पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांनी केली होती. १९८२ च्या मोसमात भारताविरोधात खेळताना सलग तीनसामन्यात तीन शतके केली होती. त्यानंतर १९९३ मध्ये  सईद अन्वर याने पाकिस्तान,श्रीलंका,वेस्ट इंडिज या शारजाह येथे झालेल्या तिरंगी मालिकेत ही कामगिरी केली होती. श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकारा याने २०१५ च्या विश्वचषकात सलग चार सामन्यात शतके झळावली होती. रोहित शर्माला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.

सलग सामन्यात शतके झळकावणारे फलंदाजकुमार संगकारा ४इतर फलंदाज प्रत्येकी तीन शतकेजहीर अब्बाससईद अन्वरहर्षेल गिब्सए.बी.डिव्हिलियर्सक्विंटन डी कॉकरॉस टेलरबाबर आझमजॉनी बेअरस्टोविराट कोहलीरोहित शर्मा

रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहास

विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती. 

अर्धशतकासह रोहित शर्मा पुन्हा ठरला अव्वलश्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. आता या सामन्यातही शतक झळकावत रोहित क्रिकेट विश्वातील इतिहासाला गवसणी घालणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''

भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.'' 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीवर्ल्ड कप 2019