Join us  

IND vs SL 1st ODI : अखेरच्या दोन षटकांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी धु धु धुतले, टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवले

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना श्रीलंकेच्या धावसंख्येवर लगाम लावला. पण, अखेरच्या दोन षटकांत सामना फिरला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 6:45 PM

Open in App

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करताना श्रीलंकेच्या धावसंख्येवर लगाम लावला. दोन वर्षांनंतर सोबत खेळणाऱ्या युजवेंद्र चहलकुलदीप यादव या जोडीनं श्रीलंकेला धक्के दिले. त्यानंतर दीपक चहर, कृणाल पांड्या व हार्दिक पांड्या यांनी विकेट्स घेतल्या.  दुखापतीमुळे बराच काळ गोलंदाजीपासून दूर असलेल्या हार्दिकनं पाच षटकांत एक विकेट घेतली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या तयारीच्या दृष्टीनं संघासाठी ही सकारात्मक बाब आहे. अखेरच्या दोन षटकातं श्रीलंकेच्या फलंदाजांनी ३२ धावा कुटल्या. 

राहुल द्रविड इम्पॅक्ट; कृणाल पांड्याच्या कृतीतून जाणवला टीम इंडियातील बदल, See Photo

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी चांगली सुरूवात करून दिली. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर व हार्दिक पांड्या हे जलदगती गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार शिखर धवननं ( Shikhar Dhawan) फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. चहलनं पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला, त्यानंतर कुलदीपनं एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या.  दोघांची ४९ धावांची भागीदारी चहलनं संपुष्टात आणली. त्यानंतर कुलदीपनं भानुका व भानुका राजपक्षा यांना एकाच षटकात माघारी पाठवले. कृणाल पांड्यानं चौथा धक्का दिला. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रथमच एकत्र खेळणाऱ्या युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी श्रीलंकेला धक्के दिले.  चरिथा असालंका व वनिंदू हसरंगा हे डोईजड होऊ पाहणारे फलंदाज दीपक चहरच्या गोलंदाजीवर सहज बाद झाले. चहरला यांची विकेट मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही. श्रीलंकेच्या ४० षटकांत ६  बाद १८६ धावा झाल्या होत्या. कर्णधार दासून शनाका संघर्ष करत होता, परंतु चहलनं त्याच्या अखेरच्या षटकात हाही अडथला दूर केला. शनाका ३९ धावांवर माघारी परतला. चहलनं १० षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यानं १० षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. अखेरच्या षटकांत धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेनं विकेट फेकल्या अन् त्यांना ९ बाद २६२ धावांवर समाधान मानावे लागले.  चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी अखेरच्या दोन षटकांत ३१ धावा चोपल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभुवनेश्वर कुमारहार्दिक पांड्याकुलदीप यादवयुजवेंद्र चहल