Join us  

IND vs SL 1st ODI : वीरूच्या पावलावर पृथ्वी शॉचे पाऊल; २००८नंतर टीम इंडियाच्या ओपनरची भारी कामगिरी, Video

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं धडाकेबाज खेळी केली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 8:02 PM

Open in App

India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) यानं धडाकेबाज खेळी केली. त्यानं श्रीलंकेच्या गोलंदाजांना उभ्या उभ्यानं चौकार खेचले. इसुरू उदानानं टाकलेल्या चौथ्या षटकात पृथ्वीनं सलग तीन खणखणीत चौकार खेचले. धनंजया डी सिल्व्हानं टीम इंडियाला पहिला धक्का दिला. त्याच्या फिरकी चेंडूवर पृथ्वीनं मारलेला फटका फसला अन् अविष्का फर्नांडोनं सोपा झेल टिपला. पण, माघारी परतण्यापूर्वी पृथ्वीनं मोठा पराक्रम केला. असा पराक्रम २००८मध्ये वीरेंद्र सेहवागनं केला होता. 

 एकाचेही अर्धशतक नाही किंवा अर्धशतकी भागीदारी नाही, श्रीलंकेनं मोडला ऑसींचा १० वर्षांपूर्वीचा विक्रम

श्रीलंकेच्या चमिका करुणारत्ने  व दुश्मंथा चमिरा यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपून काढताना टीम इंडियासमोर आव्हानात्मक लक्ष्य उभं करण्यात यश मिळवला. त्यांनी ९ बाद २६२ धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांची ४९ धावांची भागीदारी युजवेंद्र चहलनं संपुष्टात आणली. त्यानंतर कुलदीप यादवनं भानुका व भानुका राजपक्षा यांना एकाच षटकात माघारी पाठवले. कृणाल पांड्यानं चौथा धक्का दिला. चरिथा असालंका व वनिंदू हसरंगा हे डोईजड होऊ पाहणारे फलंदाज दीपक चहरच्या गोलंदाजीवर सहज बाद झाले. चहरला यांची विकेट मिळवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाही.  

कर्णधार दासून शनाका संघर्ष करत होता, परंतु चहलनं त्याच्या अखेरच्या षटकात हाही अडथला दूर केला. शनाका ३९ धावांवर माघारी परतला. चहलनं १० षटकांत ५२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्यानं १० षटकांत २६ धावांत १ विकेट घेतली. अखेरच्या षटकांत धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेनं विकेट फेकल्या. पण, ४९ व ५०व्या षटकात धावा चोपून त्यांनी ९ बाद २६२ धावा केल्या. चमिका करुणारत्ने ( ४३*) व दुश्मंथा चमिरा ( १३) यांनी अखेरच्या दोन षटकांत ३२ धावा चोपल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वीनं पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ केला. त्यानं पहिल्या विकेटसाठी शिखर धवन ५८ धावांची भागीदारी केली. यात पृथ्वीनं २४ चेंडूंत ९ चौकारासह ४३ धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या २० चेंडूंत पृथ्वीनं ३९ धावा चोपल्या. २००८मध्ये वीरूनं हाँगकाँगविरुद्ध ४१ धावा कुटल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय सलामीवीरानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ( 39 runs by Shaw in this innings is the most runs an Indian opener has scored in the first 20 balls since Sehwag scored 41 against Hong Kong in 2008). पृथ्वी माघारी परतल्यानं आलेल्या पदार्पणवीर इशान किशननं पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला.

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकापृथ्वी शॉविरेंद्र सेहवाग