Join us  

IND Vs SL 3rd T20I Live : कुलदीप यादवनं सर्वोत्तम धावा करून टीम इंडियाची लाज वाचवली, श्रीलंकेची गाडी सुसाट पळाली

India vs Sri Lanka 3rd T20I : पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सावरणं अवघड गेलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 9:34 PM

Open in App
ठळक मुद्दे कुलदीपच्या ( २३*) फटकेबाजीमुळे ७४ धावांचा पल्ला ओलांडला अन् टीम इंडियाची नाचक्की टळली. २००८मध्ये ऑस्ट्रेलियानं ७४ धावांवर टीम इंडियाचा डाव गुंडाळला होता.

India vs Sri Lanka 3rd T20I : पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या ट्वेंटी-२० सावरणं अवघड गेलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात कधी न झालेली नाचक्की झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी एकामागून एक धक्के दिले. त्यांना क्षेत्ररक्षकांनीही सुरेख साथ दिली. त्यामुळेच टीम इंडियाला ट्वेंटी-२०त शंभर धावांचा पल्लाही ओलांडता आला नाही. श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी अफलातून झेल घेतले. वनिंदू हसरंगानं ४ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. वनिंदूची ही ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.  IND VS SL Live 3rd T20I, IND vs SL 3rd T20I Live पहिल्याच षटकात दुष्मांता चमिराच्या चेंडूवर शिखर धवन स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. आयपीएलमध्ये टोलेजंग षटकार खेचणारा देवदत्त पडिक्कल व ऋतुराज गायकवाड खेळपट्टीवर होते. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु चौथ्या षटकात देवदत्तला ( ९)  रमेश मेंडिसनं पायचीत केले. वनिंदू हसरंगानं टीम इंडियाला एकामागोमाग दोन धक्के दिले. संजू सॅमसनचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कामय राहिला. हसरंगानं त्याला ( ०)  पायचीत केले आणि त्यानंतर ऋतुराजचीही ( १४) विकेट घेतली. भारताचे ४ फलंदाज २५ धावांवर माघारी परतल्यानं भुवनेश्वर कुमारला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागलं. Ind vs SL 2021, Ind vs SL 2021 3rd T20I

टीम इंडियाची अखेरची होप नितिश राणा यालाही ६ धावांवर माघारी परतावे लागले. कर्णधार दासून सनाकानं त्याच्याच गोलंदाजीवर राणाची रिटर्न कॅच घेतली. भारतानं पहिल्या १० षटकांत ५ बाद ३९ धावा केल्या. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील टीम इंडियाची ही निचांक कामगिरी आहे. ( India records their lowest ever score in a T20i game after 10 overs). यापूर्वी २०१६साली न्यूझीलंडविरुद्ध नागपूर सामन्यात भारताचे ६ फलंदाज ४२ धावांवर माघारी परतले होते, तर २००८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३ धावांत ५ विकेट्स पडल्या होत्या.  Ind vs SL 2021 Live Score, Ind vs SL 2021 Live Updates

टीम इंडियाची खिंड लढवणारा भुवनेश्वर कुमारही १५व्या षटकात हसरंगाच्या गोलंदाजीवर शनाकाकरवी झेलबाद झाला. भुवीनं ३२ चेंडूंत १६ धावा केल्या आणि त्यानं कुलदीप यादवसह १९ धावांची भागीदारी केली. अकिला धनंजयानं ४ षटकांत ११ धावा दिल्या. शनाकानं १६व्या षटकात राहुल चहरची ( ५) विकेट घेतली. हसरंगानं पुढच्या षटकात आणखी एक धक्का दिला. करुणारत्नेनं वरुण चक्रवर्थीचा अफलातून झेल टिपला. आजच्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान कुलदीप यादवनं पटकावला. ( Kuldeep Yadav is the top-scorer in the Indian innings). कुलदीपच्या ( २३*) फटकेबाजीमुळे ७४ धावांचा पल्ला ओलांडला अन् टीम इंडियाची नाचक्की टळली. २००८मध्ये ऑस्ट्रेलियानं ७४ धावांवर टीम इंडियाचा डाव गुंडाळला होता. भारताला ८ बाद ८१ धावांवर समाधान मानावे लागले. IND Vs SL 2021, IND VS SL Live T20I Match Today 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाकुलदीप यादवशिखर धवनभुवनेश्वर कुमार
Open in App