Join us  

India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार संभ्रमात, संघात कल्पकतेचा अभाव; तेंडुलकरचं मत

India vs Pakistan, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 1:45 PM

Open in App

India Vs Pakistan Live, ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील परंपरा कायम राखताना पाकिस्तान संघाला पुन्हा लोळवले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्ध पाकची विजयाची पाटी कोरीच राहिली. भारताचा हा पाकिस्तानवरील सातवा विजय ठरला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर चहुबाजूनं टीका होत आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही त्यात उडी घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद ही संभ्रमीत व्यक्ती आहे आणि या संघात कल्पकतेचा अभाव आहे, असे मत तेंडुलकरने व्यक्त केले.

भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.  या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या. रोहित शर्माच्या 140 धावांच्या खेळीला लोकेश राहुल व विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीची योग्य साथ लाभली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख वटवली.  तेंडुलकर म्हणाला,''सर्फराज संभ्रमात होता, वाहब रियाज गोलंदाजी करताना त्यानं शॉर्ट मिड-विकेटवर खेळाडू ठेवला होता, तर शाबाद खान आल्यावर स्लीप ठेवायचा. त्याचाच काही कळत नव्हतं, काय करावं." 

सर्फराज अहमद 'बिनडोक' कर्णधार; पराभवानंतर शोएब अख्तर संतापलामाजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर टीका केली. अख्तरनं सर्फराजला चक्क बिनडोक म्हटलं. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागूनही सर्फराजनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मतही अख्तरने व्यक्त केले. तो म्हणाला,''खेळपट्टी पूर्णपणे कोरडी होती. ती संपूर्ण वेळ झाकून ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्यावर दव जमण्याची कोणतीच शक्यता नव्हती. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय बिनडोकच घेऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं अशी चूक केली होती आणि आज पाकिस्ताननं त्याची पुनरावृत्ती केली.''

तो पुढे म्हणाला,''पाकिस्तानला धावांचा पाठलाग करता आलेला नाही आणि हा भारताविरुद्धचा हा इतिहास आहे. 1999 ला पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीनंतरही 227 धावा चेस करता आल्या नव्हत्या. असे असताना सर्फराजनं हा निर्णय का घेतला, हे काही कळेना.''   

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तानसचिन तेंडुलकर