IND-W vs NZ-W Live Streaming : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ २३ ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध भिडणार आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी आधीच सेमीफायनल गाठली आहे. उर्वरित एका जागेसाठी या दोन संघात तगडी टक्कर आहे. त्यामुळे महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील या सामन्याला क्वार्टरफायनलचं स्वरुप प्राप्त झाले आहे. जो संघ जिंकेल तो आपली सेमीची दावेदारी जवळपास भक्कम करेल. या सामन्यावर पावसाचेही सावट असून दोघांत तिसरा आला तर सेमीच्या समीकरणात नवे ट्विस्टही पाहायला मिळू शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्वबळावर सेमीच तिकीट मिळवण्याची शेवटची संधी
भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजयी सलामी दिल्यावर पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पण त्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या सलग तीन पराभवानंतर भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना महत्त्वपूर्ण झाला आहे. स्वबळावर सेमीत धडक मारायची असेल तर टीम इंडियाला ही लढाई जिंकावीच लागेल.
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
टीम इंडिया न्यूझीलंडपेक्षा एक पाऊल पुढे
न्यूझीलंडसाठीही अगदी हीच परिस्थिती असेल. न्यूझीलंडच्या संघाने पाच पैकी फक्त बांगलादेशविरुद्ध एकच सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांना या सामन्यात प्रत्येकी १-१ गुण मिळाला. त्यांच्या खात्यातही भारतीय संघाप्रमाणे ४ गुण जमा असून नेट रनरेटच्या जोरावर टीम इंडिया त्यांच्या एक पाऊल पुढे आहे.
दोन्ही संघातील हे खेळाडू ठरतील लक्षवेधी
भारताकडून स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात या दोघींच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली होती. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडच्या ताफ्यातून सोफी डिव्हाइन आणि अमेलिया केर यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतील. या दोघी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात.
सामना कुठे आणि कधी?
- सामना: भारत महिला vs न्यूझीलंड महिला
- स्पर्धा: ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५
- सामन्याचे ठिकाण: डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई
- तारीख: २३ ऑक्टोबर २०२५
- वेळ: दुपारी ३.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
सामना कुठे पाहू शकता?
- टीव्ही प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- लाईव्ह स्ट्रिमिंग: जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाईट
भारतीय महिला संघ -
प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंह ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, अरुंधती रेड्डी, उमा चेत्री.
न्यूझीलंड महिला संघ -
सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाइन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), जेस केर, रोजमेरी मॅयर, ब्री इलींग, इडन कार्सन, लिया ताहूहु, हॅना रो, पॉली इंग्लिस, बेला जेम्स.