Join us  

IND Vs NZ : रिषभ पंत की लोकेश राहुल? पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया, विराटचे संकेत

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 10:27 AM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे त्याच्या जागी ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसनचा, तर वन डे संघात पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं पहिल्या लढतीतील रणनीती स्पष्ट केली आहे. या सामन्यात अंतिम अकरा शिलेदार कसे असतील याची पुसट कल्पना दिली आहे.

भारतीय संघानं 2020 सालाची दणक्यात सुरुवात केली. टीम इंडियानं श्रीलंकेला ट्वेंटी-20 मालिकेत ( 2-0) आणि ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत ( 2-1) पराभूत केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत यष्टिरक्षक रिषभ पंत याला दुखापत झाल्यानंतर सलामीवर रिषभ पंत यष्टिंमागे दिसला होता. त्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यावरही हेच चित्र पाहायला मिळेल का, याची उत्सुकता सर्वांना होती. यावर विराटनं स्पष्ट मत मांडलं.

'उद्याच्या सामन्यात लोकेश राहुल सलामीला येईल आणि यष्टिंमागेही दिसेल, असे संकेत विराटनं पत्रकार परिषदेत दिले. पहिल्या ट्वेंटी-20त रिषभ पंतच्या जागी मनीष पांडेला खेळवणार असल्याचेही त्यानं स्पष्ट केलं. शिवाय वन डे क्रिकेटमध्येही लोकेशकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी दिली जाईल. पण, त्याच वेळी वन डे क्रिकेटमध्ये राहुल हा सलामीचा पर्याय नसून पृथ्वी शॉ याला रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची संधी मिळेल, असेही संकेत विराटने दिले. विराटच्या या संकेतामुळे रिषभ पंतची कारकिर्द धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

ट्वेंटी-20भारत विरुद्ध न्यूझीलंड - 24 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 26 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 31 जानेवारी, दुपारी 12.30 वा.भारत विरुद्ध न्यूझीलंड - 2 फेब्रुवारी, दुपारी 12.30 वा.

भारताचा संघ - विराट कोहली (कर्णधार), संजू सॅमसन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर.

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), हामिश बेन्नेट, टॉम ब्रूस ( 4-5 सामन्यासाठी), कॉलिन डी ग्रँडहोम ( पहिल्या तीन सामन्यांसाठी), मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेन, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, टीम सेईफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीरिषभ पंतलोकेश राहुल