Join us  

वन-डे मालिकेत न्यूझीलंड विरुद्ध भारताचे पारडे जड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शानदार कामगिरीनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचे बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध प्रारंभ होत असलेल्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत पारडे वरचढ राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:06 AM

Open in App

नेपियर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शानदार कामगिरीनंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाचे बुधवारपासून न्यूझीलंड विरुद्ध प्रारंभ होत असलेल्या पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत पारडे वरचढ राहील.विश्वकप स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणारा भारतीय संघ मधल्या फळीतील अचूक संयोजनाच्या शोधात आहे. आॅस्ट्रेलियात प्रथमच द्विपक्षीय वन-डे मालिका जिंकल्यानंतरही भारतीय संघाला अद्याप मधल्या फळीतील समस्येवर तोडगा सापडलेला नाही.महेंद्रसिंग धोनीने सलग तीन अर्धशतके झळकावताना टीकाकारांना उत्तर दिले आहे, पण न्यूझीलंडच्या छोट्या मैदानावर ट्रेंट बोल्ट, लोकी फग्युर्सन व टीम साऊदी यांच्या वेगवान माºयाला उत्तर देणे भारतासाठी सोपे नाही. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विराट म्हणाला, ‘न्यूझीलंड जगातील तिसºया क्रमांकाचा संघ असून गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. आम्ही भारतात त्याच्या विरुद्ध खेळलो आणि मुंबईमध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. सर्वंच लढती रंगतदार ठरल्या होत्या. त्यांचा संघ संतुलित आहे.’भारतीय संघासाठी शिखर धवनचा फॉर्म, धोनीचा फलंदाजी क्रम आणि हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमध्ये संघाचा योग्य समतोल साधणे मोठी समस्या आहे.गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांना तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराजकिंवा खलिल अहमद यांच्याकडून अधिक सहकार्याची अपेक्षाराहील. न्यूझीलंडची आघाडीचीफळी मजबूत भासत आहे. त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकीएक केन विलियम्सन व रॉसटेलर यांच्यासारखे आक्रमक खेळाडू आहेत. टेरलची गेल्या वर्षी कोहलीनंतर सर्वोत्तम फलंदाजी सरासरी (९२) होती.(वृत्तसंस्था)

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड