Join us  

India vs New Zealand ODI : हॅमिल्टनचा इतिहास भारताच्या विरोधात, पण रोहित विक्रमासाठी सज्ज

India vs New Zealand ODI : भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:28 PM

Open in App

हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघाने सलग तीन वन डे सामने जिंकून न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 2009नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. गुरुवारी खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. यावेळी न्यूझीलंडमध्ये एक वेगळा पराक्रम करण्याची संधी रोहितला आहे. भारतीय संघाने यापूर्वी न्यूझीलंडमध्ये कधीच सलग चार वन डे सामने जिंकलेले नाही आणि गुरुवारी त्यांना हा पराक्रम करण्याची संधी आहे. भारतीय संघाने आशिया खंडाबाहेर इंग्लंड आणि झिम्बाब्वे येथेच सलग चार सामने जिंकले आहेत. 

कर्णधार कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरीत दोन वन डे आणि ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे रोहित नेतृत्व करणार आहे. चार महिन्यानंतर रोहित भारतीय वन डे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून दिला होता. रोहितने 10 डिसेंबर 2017मध्ये पहिल्यांदा भारताचे नेतृत्व केले. तेव्हा भारतीय संघाने श्रीलंकेला 7 विकेटने पराभूत केले होते. त्यानंतर रोहितने कर्णधार म्हणून सातही सामन्यांत विजय मिळवला आहे. कर्णधार म्हणून रोहितची विजयाची सरासरी ही 87.5 टक्के आहे. 

हॅमिल्टन येथे भारतीय संघाने 1981 साली पहिला सामना खेळला होता, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. या स्टेडियमवर विजय मिळवण्यासाठी 2009 साल उजाडले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने हॅमिल्टनवर पहिल्यांदा विजयाची चव चाखली. येथे खेळलेल्या पाच सामन्यांत भारताचा तो एकमेव विजय आहे. 

असा असेल संभाव्य संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, शुबमन गिल, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, खलील अहमद, कुलदीप यादव. 

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध न्यूझीलंड