Join us  

India vs New Zealand : भारताचा विजयरथ रोखण्यासाठी न्यूझीलंडच्या ट्वेंटी-20 संघात दोन नवीन भिडू

India vs New Zealand: वन डे मालिका गमावल्यानंतर ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून शिल्लक राहिलेली इभ्रत वाचवण्याचा न्यूझीलंड संघाचा प्रयत्न आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 9:00 AM

Open in App
ठळक मुद्देभारत-न्यूझीलंड चौथा वन डे सामना गुरुवारीपाच सामन्यांच्या मालिकेनंतर ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवातट्वेंटी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघात दोन नवीन चेहरे

वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : वन डे मालिका गमावल्यानंतर ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवून शिल्लक राहिलेली इभ्रत वाचवण्याचा न्यूझीलंड संघाचा प्रयत्न आहे. वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारताने यजमानांना डोकं वर काढू दिलं नाही. या मालिकेतील दोन सामने शिल्लक असून 6 फेब्रुवारीपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाने बुधवारी संघ जाहीर केला आणि त्यात अष्टपैलू डॅरील मिचेल आणि गोलंदाज ब्लेअर टिकनर या नव्या भिडूंना संधी देण्यात आली आहे. सुपर स्मॅश लीगमध्ये धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर मिचेलने न्यूझीलंडच्या ट्वेंटी-20 संघात स्थान पटकावले आहे. तसेच त्याने न्यूझीलंड A संघाकडूनही लक्षवेधी कामगिरी केली आहे. टिकनर हा तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाकडून खेळेल. हॅमिल्टन येथे होणाऱ्या या सामन्यात लॉकी फर्ग्युसनच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे.  दुखापतग्रस्त जिमी निशॅम याच्या जागी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान मिळवलेल्या डॉज ब्रेसवेलने भारताविरुद्धही आपले स्थान कायम राखले आहे. 

मिचेलने 23 बॉलमध्ये 61 धावांची वादळी खेळी करून निवड समितीचे प्रमुख गॅव्हीन लार्सेन यांना प्रभावित केले. लॅर्सेन म्हणाले,'' मिचेल आणि टिकनर यांनी स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघात स्थान पटकावले आहे. '' कर्णधार केन विलियम्सन ट्वेंटी-20 संघात पुनरागमन करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत केनला विश्रांती देण्यात आली होती. हेन्री निकोल्सच्या जागी केन संघात पुनरागमन करत आहे.  

न्यूझीलंडचा संघ : केन विलियम्सन ( कर्णधार), डॉज ब्रेसवेल, कॉलीन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन ( 1 व 2 सामना), मार्टिन गुप्तील, स्कॉट कगलेईंज, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, मिचेल सँटनर, टीम सेइफर्ट ( यष्टिरक्षक), इश सोढी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर ( 3 सामना). 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडन्यूझीलंड