Join us  

IND vs NZ, Test Series : टीम इंडियाच्या शिलेदारांसाठी नवा 'डाएट प्लॅन'; एका मेन्यूमुळे BCCI वर भडकले फॅन्स

India vs New Zealand Test Series , Team India Diet Plan : बीसीसीआयनं खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी  नवा डाएट प्लान बनवला आहे आणि त्यावरून फॅन्स भडकले आहेत आणि सोशल मीडियावर बीसीसीआयविरोधात मोहीम सुरू केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 10:35 AM

Open in App

India vs New Zealand Test Series , Team India Diet Plan : ट्वेंटी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील  ( WTC) मालिकेसाठी कानपूर येथे दाखल झाला आहे. २५ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धची पहिली कसोटी कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयनं खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी  नवा डाएट प्लान बनवला आहे आणि त्यावरून फॅन्स भडकले आहेत आणि सोशल मीडियावर बीसीसीआयविरोधात मोहीम सुरू केली आहे. 

काय आहे खेळाडूंचा डाएट प्लान?

  • भारतीय खेळाडूंच्या दिवसाची सुरुवात सलाड, सूप, इडली, डोसा आणि पोहा या नाश्त्यानं होईल. तेच दुपारच्या व रात्रीच्या जेवणार शाकाहारी व मांसाहारी पर्यायांसह डाळ-भात असणार आहे. शुक्रवारी खेळाडू लँडमार्क हॉटेलमध्ये दाखल झाले आणि खेळाडूंना संत्री, लिंबू आणि नारळ पाणी दिलं गेलं. 
  • जेवणात खेळाडूंना तीन प्रकारचे सूप, सलाड, ड्राय नॉनव्हेज, नॉनव्हेज, व्हेज ड्राय, व्हेज प्रोटीन डिश, व्हेज करी डिश,  डाळ-भात, रोटी, दही दिलं जाईल. व्यायामानंतर खेळाडूंना व्हेज व नॉनव्हेज असे स्नॅक्स दिले जाईल. खेळाडूंसाठी हॉटेलच्या १७व्या मजल्यावर जेवणाची सोय केली गेली आहे.
  • न्यूझीलंड संघासाठी नाश्त्यात रेड मीट, चिकन फिश, पास्ता, फळं व भाज्या दिल्या जातील. चहापानाच्या वेळेत सूप, प्लेन बिस्किट, फ्रुट केक, मिक्स नट्स आणि जेवणाच्या वेळेत कार्बोहायड्रेट, भात, दोन भाज्या, सलाड असेल. 

 

वाद कशावरून सुरूय ?स्पोर्ट्स टकनं दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयनं तयार केलेल्या या डाएट प्लानमध्ये बिफ व पोर्क याच्यावर बंदी घातली गेली आहे आणि खेळाडूंना फक्त हलाल मिट खाण्यास सांगितले गेले आहे. त्यामुळे चाहत्यांनी #BCCI_Promotes_Halal हा ट्रेंड सुरू केला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडबीसीसीआय
Open in App