India vs New Zealand: विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही मागितली सुट्टी; जाणून घ्या न्यूझीलंडविरुद्ध कोणाकडे असेल कर्धारपदाची जबाबदारी

India vs New Zealand: भारतीय खेळाडू मागील ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. इंग्लंड दौरा, आयपीएल २०२१, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:37 PM2021-11-11T17:37:55+5:302021-11-11T17:38:32+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand: Ajinkya Rahane will lead India in test matches against NZ, Rohit Sharma and Virat Kohli both to be rested | India vs New Zealand: विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही मागितली सुट्टी; जाणून घ्या न्यूझीलंडविरुद्ध कोणाकडे असेल कर्धारपदाची जबाबदारी

India vs New Zealand: विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्मानंही मागितली सुट्टी; जाणून घ्या न्यूझीलंडविरुद्ध कोणाकडे असेल कर्धारपदाची जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs New Zealand: भारतीय खेळाडू मागील ६ महिन्यांपासून बायो बबलमध्ये आहेत. इंग्लंड दौरा, आयपीएल २०२१, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. १७ नोव्हेंबरपासून तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत ( WTC) दोन  कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. विराट कोहलीनं ( Virat Kohli) ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ती जबाबदारी रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खांद्यावर सोपवण्यात आली आहे. लोकेश राहुल ( KL Rahul) उपकर्णधार असणार, ही घोषणा बीसीसीआयनं नुकतीच केली. विराटनं  विश्रांती घेतली आहे आणि आता रोहितनंही  बीसीसीआयकडे सुट्टी मागितल्याचे वृत्त TOI नं दिले आहे. त्यामुळे आता कर्णधार कोणाला करावं, हा प्रश्न बीसीसीआयला सतावत आहे.

सततच्या क्रिकेटमुळे ट्वेंटी-२० मालिकेसाठी निवडलेल्या संघातून विराट, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. विराटनं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतूनही विश्रांती मागितली आहे आणि तो मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणे अपेक्षित आहे. या मालिकेत बीसीसीआय बुमराह, शमी, शार्दूल व रिषभ पंत यांनाही विश्रांती देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित सांभाळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, आता रोहितनंही कसोटी मालिकेतून विश्रांती मागितली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली टीम इंडिया कसोटी मालिकेत किवींचा सामना करण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्या कसोटीत ३६ धावांवर ऑल आऊट झाल्यानंतर विराट पितृत्व रजेवर गेला होता आणि तेव्हा अजिंक्यनं युवा खेळाडूंना सोबत घेऊन टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले व संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून दिला होता. त्यामुळे कसोटी मालिकेत विराट व रोहितच्या अनुपस्थितीत अजिंक्यकडेच ही जबाबदारी राहील. बीसीसीआयनं कसोटी मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाही. 

India vs New Zealand Schedule 2021

  •  पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१,  जयपूर
  •  दूसरा ट्वेंटी-२० -  १९  नोव्हेंबर, २०२१,  रांची
  • तिसरा ट्वेंटी-२० -  २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता
  • पहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई
     

न्यूझीलंडचा कसोटी संघ - केन विलियम्सन, टॉम ब्लंडल, डेव्हान कॉनवे, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल समरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर 

Web Title: India vs New Zealand: Ajinkya Rahane will lead India in test matches against NZ, Rohit Sharma and Virat Kohli both to be rested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.