Join us  

IND Vs NZ : टीम इंडिया अन् न्यूझीलंड यांनी मिळून घडवला विश्वविक्रम, ट्वेंटी-20त प्रथमच घडला पराक्रम

भारतीय संघानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्या विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 1:12 PM

Open in App

भारतीय संघानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्या विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. ऑकलंडच्या इडन पार्कवर झालेल्या सामन्यात टीम इंडियानं 6 विकेट राखून किवींनी ठेवलेलं 204 धावांचं लक्ष्य पार केले. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकी खेळीनं टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात टीम इंडिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी मिळून एका विश्वविक्रमाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारे हे दोन्ही संघ पहिलेच ठरले.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्तील ( 30) आणि कॉलिन मुन्रो यांनी दमदार सुरुवात केली. मुन्रोनं 42 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचताना 59 धावा केल्या. कर्णधार केन विलियम्सननं 26 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 51, तर रॉस टेलरनं 27 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 54 धावा चोपल्या. या खेळींच्या जोरावर किवींनी 5 बाद 203 धावांचा डोंगर उभा केला.

टीम इंडियानं लोकेश राहुल ( 56), विराट कोहली ( 48) आणि श्रेयस अय्यर ( 58*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 6 विकेट व 6 चेंडू राखून हा सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात दोन्ही संघांतील पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यासह टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांनी दोघांनी मिळून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.   

...तर धोनी IPL नंतर 'थँक यू व्हेरी मच' म्हणेल; शास्त्रीबुवांचं सूचक विधान

बाबो, या संघानं पटकावला कसोटीत 5 लाख धावा करण्याचा पहिला मान

श्रेयस अय्यर भविष्यातील मोठा फलंदाज

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडलोकेश राहुलरॉस टेलर